जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Covid-19 Vaccine shortage: राज्यात उद्यापर्यंत पुरेल इतकाच लशींचा साठा शिल्लक

Covid-19 Vaccine shortage: राज्यात उद्यापर्यंत पुरेल इतकाच लशींचा साठा शिल्लक

Covid-19 Vaccine shortage: राज्यात उद्यापर्यंत पुरेल इतकाच लशींचा साठा शिल्लक

Covid-19 Vaccine shortage in Maharashtra: राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला असल्याचं वृत्त समोर येत आहे. काही लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस (Covid-19 vaccine) देण्यास राज्यात सुरुवात केली असून लसीकरणात महाराष्ट्र अव्वल आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना आता कोरोना प्रतिबंधक लसींचा राज्यात तुटवडा (Covid-19 vaccine shortage) निर्माण झाला आहे. यामुळे राज्य सरकारची (Maharashtra Government) डोकेदुखी आणखी वाढली आहे. एक-दोन दिवसांत लशीचा तुटवडा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत कोविड-19 लस साठा हा एक ते दोन दिवसांत संपेल आणि त्यासंदर्भात केंद्र सरकारला माहिती दिली आहे अशी माहिती राज्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी दिली. बुधवारी सकाळपर्यंत राज्यात सुमारे 14 लाख लसींचे डोस उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास (Principal Secretary Health Pradeep Vyas) यांनी दिली. …तर राज्यात दिवसाला 5 लाख नागरिकांचे लसीकरण अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आज किंवा उद्या अनेक जिल्ह्यांतील कोविड-19 प्रतिबंधक लसींचा साठा संपेल. केंद्राला या परिस्थितीची जाणीव आहे आणि आम्ही लेखी सुद्धा कळवले आहे.” लसीकरणाचं वेळापत्रक आणि उपलब्ध करुन दिल्यास महाराष्ट्रात एका दिवसाला पाच लाख लसींचे डोस सहजपणे दिले जाऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दररोज सुमारे चार लाख नागरिकांचे लसीकरण होत आहे. रोगप्रतिबंदक लस टोचण्याच्या मोहिमेतून आतापर्यंत महाराष्ट्रातील 85,64,908 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

हे पण वाचा:  मोठी बातमी, राज्यात 3 दिवस इतकाच लसीकरणाचा साठा, राजेश टोपेंनी केंद्राकडे मागितली मदत लस वाया जाण्याचे प्रमाणही खूपच कमी मंगळवारी सरकारच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, राज्याला 1.06 कोटी लसींचे डोस उपलब्ध झाले असून त्यापैकी 88 लाख डोस वापरण्यात आले आहेत. राज्यातील लस वाया जाण्याचे प्रमाणही खूपच कमी आहे. राज्यात सध्याचा लसींचा साठा लक्षात घेता केंद्र शासनाकडून तातडीने मागणी प्रमाणे पुरवठा होणे गरजेचे आहे. तसेच कोव्हॅक्सिनची मागणी वाढल्याने त्याचाही अतिरिक्त पुरवठा करावा असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात 25 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची मागणी राज्यात 25 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे. राज्यात सध्या रुग्ण संख्या आढळतेय त्यात 25 ते 40 वयोगटातील संख्या अधिक आहे आणि या वयोगटातील नागरिकांना व्यवसायानिमित्त बाहेर पडावे लागते. ही बाब लक्षात घेऊन 25 वर्षांवरील नागरिकांचा समावेश लसीकरणाच्या प्राधान्य यादीत करण्याची मागणीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात