नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : आतापर्यंत कोरोना लस (Corona vaccine) घेण्यासाठी कोरोना लसीकरण (Corona vaccination) केंद्रावर जावं लागत होतं (Corona vaccination in india). पण आता घरच्या घरीच कोरोना लस घेता येणार आहे (Corona vaccination at home) . डोअर टू डोअर लसीकरणाला (Door to door corona vaccination) केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. दारोदारी लसीकरणाबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बऱ्याच नागरिकांसाठी हा दिलासा आहे. किती तरी लोक असे आहेत, जे दिव्यांग आहेत किंवा आजारी आहेत. ज्यामुळे त्यांना जागेवरून हलता येत नाही. पण त्यांनी कोरोना लस घेणं गरजेचं आहे कारण त्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. पण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलताही येत नसल्याने लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचणं त्यांना शक्य होत नाही. अशा नागरिकांसाठी याआधी सरकारने जवळच लसीकरण केंद्र उपलब्ध करून दिले होते. पण अद्यापही काही लोकांना तिथपर्यंतही जाता येत नाही हे सरकारच्या निदर्शनास आलं.
We will be giving COVID-19 vaccines at home to differently-abled and those with restricted mobility: Govt
— Press Trust of India (@PTI_News) September 23, 2021
त्यामुळे सरकारने आता दिव्यांग आजारी, आजारपणामुळे अंथरूणाला खिळलेले रुग्ण अशा सर्वांसाठी घरीच कोरोना लस घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी रजिस्ट्रेशन करण्याचीही गरज नाही. यासाठी गाइडलाइन्सही जारी करण्यात आल्या आहेत. हे वाचा - सुसाट! भारत देश पुन्हा एकदा कोरोना लसीकरणात सुपरफास्ट भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण (Vaccination) मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत 83 कोटीहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. 66% प्रौढ नागरिकांना कोरोमना लशीचा एक डोस देण्यात आला आहे, तर 23 टक्के नागरिकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, लसीकरण मोहिमेचा नियमितपणे आढावा घेतला जात असून देशातील सर्वात असुरक्षित असलेल्या घटकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांचे निरीक्षण केलं जातं आहे. हे वाचा - ‘2022 पर्यंत भारतात तयार होणार 100 कोटी कोरोना लसींचे डोस’ आता केंद्राने घऱोघरी लसीकरणाचा निर्णय घेतल्याने कितीतरी नागरिकांचा लसीकऱणाचा मार्ग सोपा झाला आहे. त्यामुळे कोरोना लसीकऱणाचा आकडाही अधिक वाढेल.