नवी दिल्ली: नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेनं 'संजीवनी- अ शॉट ऑफ लाइफ' या उपक्रमाला सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे. तसेच संभाषणाला सुरुवात करून लोकांचा लसीकरणाविषयीचा भ्रम दूर केला जाणार आहे. तसेच वास्तविक स्थितीत बदल घडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
यावेळी डीजी अस्थाना यांनी लशीबाबत नागरिकांमध्ये पसरलेल्या भ्रामक कल्पनांबाबत मोकळेपणाने संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, 'एक सैनिक म्हणून आम्हाला सीमेवर लढावं लागतं, त्यामुळे सर्व जवानांनी कोरोना लस घेतली आहे.' ते पुढं असंही म्हणाले की, 'देशाच्या शत्रुविरुद्धपेक्षा आपल्या आरोग्याच्या शत्रूशी लढणं जास्त महत्त्वाचं आहे.'