Home /News /coronavirus-latest-news /

Covid रुग्णाला जगविण्यासाठी थ्री इडियट्सप्रमाणे टू व्हिलरवर रुग्णालयात घेऊन गेले अश्विन-रेखा

Covid रुग्णाला जगविण्यासाठी थ्री इडियट्सप्रमाणे टू व्हिलरवर रुग्णालयात घेऊन गेले अश्विन-रेखा

रुग्णवाहिकेची वाट न पाहता अश्विन व रेखा या रुग्णाला बाईकवर बसवून रुग्णालयात घेऊन गेले. मुख्यमंत्र्यांकडूनही या दोघांचं कौतुक होत आहे.

    केरळ, 8 मे : केरळमध्ये माणुसकीचं दर्शन घडविणारी एक घटना समोर आली आहे. येथे कोरोना केअर सेंटरमध्ये तैनात दोन स्वयंसेवकांनी कोरोना रुग्णांची प्रकृती खालावत असल्या कारणाने बाइकवर बसून रुग्णालयात नेलं. स्वयंसेवकांनी उचलेलं हे पाऊल पाहून मुख्यमंत्री पिनराई विजयनही त्यांचं कौतुक करीत आहेत. ही घटना केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यातील पुन्नापारा गावातील आहे. येथे कोविड केअर सेंटरमध्ये तैनात दोन स्वयंसेवक गंभीर कोरोना रुग्णांना बाइकवर बसवून रुग्णालयापर्यंत घेऊन गेले. सीएम विजयन यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, या दोघांनी चांगलं काम केलं आहे. त्यांचं कौतुक आहे. चांगली बाब म्हणजे त्या रुग्णाची प्रकृती सुधारत आहे. हेे ही वाचा-आता कोरोना रुग्णांसाठी मोबाइलवर बुक होणार खाटा; मुख्यमंत्र्यांनी सुरू केलं APP अश्विन कुंजुंमोन आणि रेखा पुन्नापारा डोमेसाइल केअर सेंटरमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करीत होते. शुक्रवारी जेव्हा अश्विन आणि रेखा रुग्णांना जेवणासाठी गेले, तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की, एका रुग्णाची प्रकृती खराब होत आहे. त्याला श्वास घ्यायला त्रास होत आहे. ज्यानंतर दोघांनी इतर रुग्णांच्या मदतीने त्यांना खाली आणलं. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी आधी रुग्णवाहिकेसाठी फोन केला होता, मात्र त्यांना येण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागणार होते. शेवटी रुग्णाची प्रकृती बिघडत असल्याचं पाहून दोघांनी त्या रुग्णाला बाईकवरुन नेण्याचं ठरवलं. कोविड केअर सेंटरपासून रुग्णालयापर्यंतचं अंतर 100 मीटरच्या जवळपास आहे. आजतकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. केरळमध्ये संसर्गाच्या गतीवर नियंत्रण आणण्यासाठी शनिवारी संपूर्ण लॉकडाऊन केला आहे. हा लॉकडाऊन 16 मेपर्यंत असणार आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 38,460 नवीन रुग्ण समोर आले आहेत. याशिवाय 54 मृत्यू झाले आहेत. आतापर्यत या राज्यात 18,24,856 कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. याशिवाय आतापर्यंत 5682 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात सक्रिय रुग्णसंख्या 4,02,650 इतकी आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona patient, Coronavirus cases, Fight covid, Kerala

    पुढील बातम्या