लंडन, 11 जानेवारी : कोरोना व्हायरसचे (Covid-19) नवीन प्रकार लोकांची चिंता वाढवत आहेत. अशात या वेळी एकापेक्षा जास्त व्हायरसचा हल्ला त्रासदायक ठरत आहेत. डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या मिश्रणासह, फ्लू आणि कोरोना विषाणूचा एकाचवेळी संसर्ग झाल्याचे ऐकू येत आहेत. दरम्यान, एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की सामान्य सर्दीमध्ये (Common Cold) आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (Immune System) सक्रिय झाल्याने कोविड-19 च्या संसर्गापासून काही प्रमाणात संरक्षण मिळत आहे. आपल्या संशोधनाची खात्री देऊनही त्यांनी सावध केलंय की यानंतरही कोविड पूर्णपणे बरा होईल किंवा लसीची गरज भासणार नाही असे म्हणणे योग्य ठरणार नाही. कोणत्या प्रकारची प्रतिकारशक्ती? नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित झालेल्या या छोट्या अभ्यासात नुकतेच कोविड-19 संसर्ग झालेल्या लोकांजवळ राहणाऱ्या 52 लोकांचा समावेश होता. या अभ्यासात, असे नोंदवले गेले आहे की ज्या लोकांना सामान्य सर्दी झाल्यानंतर विशिष्ट प्रकारच्या रोगप्रतिकारक पेशींच्या स्मृती विकसित होतात, त्या त्यांना कोविड-19 संसर्गाशी लढण्यासाठी मदत करतात. यावर विश्वास ठेवू नका जरी अशी रोगप्रतिकारशक्ती तुमचं संरक्षण करत असली तरी लोकांनी यावर अवलंबून राहू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनाला रोखण्यास लसीची मोठी भूमिका आहे, त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. तरीही, तज्ञांचा असा विश्वास आहे की त्यांच्या तपासणीमुळे मानवी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती या विषाणूशी कशी लढा देते याबद्दल बरीच माहिती मिळू शकते. दोन्ही व्हायरसचा संसर्ग कोविड-19 हा आजार एका प्रकारच्या कोरोना विषाणूमुळे होतो आणि काही सर्दी दुसऱ्या प्रकारच्या विषाणूमुळे होते. त्यामुळेच या विषाणूंमुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती इतर संसर्गासाठी उपयुक्त ठरू शकते की नाही हे शास्त्रज्ञ जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. 99 वर्षांपूर्वी शोधलेल्या स्वॅबची कहाणी, जी कोविडमध्ये ठरतेय सर्वात उपयोगी टी पेशींची भूमिका लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमधील टीम कोविड-19 विषाणूचा संसर्ग फक्त काही लोकांनाच का होतो, सर्वांनाच का होत नाही हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. शरीराच्या प्रतिकारशक्तीचा एक विशेष भाग असलेल्या टी पेशींवर त्यांनी आपला अभ्यास केंद्रित केला. काही टी पेशी सामान्य सर्दी विषाणूसारख्या विशिष्ट धोक्यांमुळे संक्रमित झालेल्या पेशींना मारून कार्य करतात.
अभ्यासात काय आढळून आले? या अभ्यास गटातील निम्म्या लोकांना 28 दिवसांच्या अभ्यासादरम्यान कोविड-19 झाला. मात्र, उर्वरित लोकांना संसर्ग झाला नाही. ज्यांना कोविड-19 संसर्ग झाला नव्हता अशा एक तृतीयांश गटाच्या रक्तात विशिष्ट मेमरी टी पेशींची उच्च पातळी आढळून आली. या पेशी उद्भवल्या असाव्यात जेव्हा त्यांच्या शरीरात दुसर्या प्रकारच्या मानवी विषाणूचा संसर्ग झाला असेल जो सामान्य सर्दी सारख्या संसर्गामध्ये तयार होतो. Third wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ‘या’ उत्पादनांच्या साठ्यावर परिणाम! संशोधकांचे म्हणणे आहे की हा एक छोटासा अभ्यास आहे. परंतु, आपली रोगप्रतिकारक शक्ती विषाणूशी कशी लढते हे समजून घेण्यास उपयुक्त ठरेल. यामुळे भविष्यात लस तयार करण्यात मदत होईल. त्यांनी असेही सांगितले की टी पेशी विषाणूच्या अंतर्गत प्रथिनांना लक्ष्य करतात जे प्रकारांसह फारसे बदलत नाहीत. त्यामुळे लसीचे महत्त्व कमी लेखता येणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.