मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Third wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे 'या' उत्पादनांच्या साठ्यावर परिणाम! फक्त 15 दिवसांचा स्टॉक शिल्लक

Third wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे 'या' उत्पादनांच्या साठ्यावर परिणाम! फक्त 15 दिवसांचा स्टॉक शिल्लक

Third wave: अनेक राज्यांच्या कडक निर्बंधांमुळे आणि दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू सारख्या काही राज्यांमध्ये वीकेंड कर्फ्यू लागू केल्यामुळे डीलर्स अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलत आहेत.

Third wave: अनेक राज्यांच्या कडक निर्बंधांमुळे आणि दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू सारख्या काही राज्यांमध्ये वीकेंड कर्फ्यू लागू केल्यामुळे डीलर्स अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलत आहेत.

Third wave: अनेक राज्यांच्या कडक निर्बंधांमुळे आणि दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू सारख्या काही राज्यांमध्ये वीकेंड कर्फ्यू लागू केल्यामुळे डीलर्स अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलत आहेत.

नवी दिल्ली, 11 जानेवारी : जगभरात सर्वत्र आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं (Third Wave) थैमान सुरू झालं आहे. आपल्या देशातही या लाटेला सुरुवात झाली असून ऑमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या विषाणू प्रकारचा संसर्ग झपाट्यानं वाढत असल्यानं रुग्णसंख्या प्रचंड वेगानं वाढत आहे. त्यामुळे सुरक्षिततेचे उपाय म्हणून पुन्हा निर्बंध लागू करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी संचारबंदी, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापार, व्यवसायावरही परिणाम झाला असून, किरकोळ विक्रेते, डीलर्स यांनी आपल्याकडील शिल्लक साठा संपवण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. टेलिव्हिजन, वॉशिंग मशीन्स तसंच फुटवेअरसारख्या उत्पादनांच्या वितरकांनी गेल्या 15 दिवसांत त्यांच्याकडील शिल्लक साठ्यात वार्षिक आधारावर एक तृतीयांश कपात केली आहे. मनी कंट्रोलनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

टेलिव्हिजन, स्मार्टफोन, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, फुटवेअर कंपन्यांच्या मते, कोरोनाच्या दोन लाटांदरम्यानचा अनुभव लक्षात घेऊन बहुतेक किरकोळ विक्रेते आणि वितरक (Distributions) त्यांच्याकडील शिल्लक मालाचा साठा (Inventory) 30 दिवसांचा ठेवण्याऐवजी 15 दिवस पुरेल इतकाच ठेवू इच्छितात. कारण आता मागणी कमी झाल्यामुळे रोख रकमेच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे, ते टाळण्यासाठी माल कमी मागवण्याकडे त्यांचा कल आहे. कोरोनाच्या दोन लाटांनंतर आता हळूहळू व्यापार, व्यवसाय सावरत होते. मात्र, या नव्या विषाणूमुळे पुन्हा संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे आता जानेवारी महिन्यात व्यापारावर पुन्हा दबाव दिसून येईल, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

Omicron व्हेरिएंटवरही येणार लस; Pfizer ने सुरू केली निर्मिती, कधी होणार उपलब्ध?

कोरोनाच्या नवीन प्रकाराच्या वाढत्या संसर्गामुळे मागणीवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज किरकोळ विक्रेत्यांनी व्यक्त केला असून, पुढे काय होणार याबाबत स्पष्ट चित्र नाही. त्यामुळे व्यापारी साठा कमी करण्यासारखी पावले उचलत आहेत. डिपार्टमेंटल स्टोअर चेन लाईफस्टाईल इंटरनॅशनलचे (Departmental store chain Lifestyle International) सीईओ देवराजन अय्यर यांनी सांगितलं की, 'नवीन ऑर्डर देण्यासाठी व्यापारी 'थांबा आणि पाहा' अशी रणनीती अवलंबत आहेत. विक्रीवर होणारा परिणाम आणि सरकार घालत असलेले निर्बंध या पार्श्वभूमीवर पुढील दोन आठवडे कसे जातात यावर नवीन ऑर्डर्स अवलंबून असतील.'

एलजी इलेक्ट्रॉनिक्स, कॅरियर मिडिया (Carrier Midea) आणि गोदरेज अप्लायन्सेस (Godrej) सारख्या कंपन्यांनीही डीलर्स कमी खरेदी करत आहेत, ज्यामुळे कंपन्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाल्याचं मान्य केलं आहे.

ज्या राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, तिथं राज्य सरकार कडक निर्बंध लादत आहेत. रात्री संचारबंदी ऑड-इव्हन पद्धतीनुसार किरकोळ दुकानं उघडणं, व्यवसायाचे तास कमी करणं असे उपाय राबवले जात असून, दिल्ली, कर्नाटक आणि तमिळनाडूसारख्या काही राज्यांनी आठवड्याच्या शेवटचे दोन दिवस संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे आगामी काळात मागणी घटण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Corona updates, Coronavirus