मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

COVAXIN ला काही तासांत मंजुरी मिळण्याची शक्यता, लवकरच येऊ शकते GOOD NEWS

COVAXIN ला काही तासांत मंजुरी मिळण्याची शक्यता, लवकरच येऊ शकते GOOD NEWS

भारत बायोटेकच्या (Covaxin likely to get approval in WHO soon) कोव्हॅक्सिन लसीला काही तासांतच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

भारत बायोटेकच्या (Covaxin likely to get approval in WHO soon) कोव्हॅक्सिन लसीला काही तासांतच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

भारत बायोटेकच्या (Covaxin likely to get approval in WHO soon) कोव्हॅक्सिन लसीला काही तासांतच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : भारत बायोटेकच्या (Covaxin likely to get approval in WHO soon) कोव्हॅक्सिन लसीला काही तासांतच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत भारत बायोटेकच्या (WHO meeting with Bharat Biotech representatives) पदाधिकाऱ्यांची बहुप्रतिक्षित बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत कोव्हॅक्सिनच्या आपातकालीन वापराला जागतिक आरोग्य संघटना (Possibility of approval) मंजुरी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मंजुरीकडे भारतीयांच्या नजरा

जर कोव्हॅक्सिनला मंजुरी मिळाली, तर परदेश प्रवास करणाऱ्या कोट्यवधी भारतीयांसाठी तो मोठा दिलासा ठरले. भारतातील कोव्हिशिल्ड लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असल्यामुळे बहुतांश देशांत ही लस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश मिळतो. मात्र कोव्हॅक्सिनला अद्यापही मंजुरी मिळालेली नसल्यामुळे ती लस घेतलेल्या नागरिकांच्या प्रवासावर अद्यापही मर्यादा आहेत.

बैठकीकडे सर्वांचं लक्ष

जागतिक आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत भारत बायोटेकच्या अधिकाऱ्यांची सध्या बैठक सुरू आहे. गेल्या आठवड्यात, या बैठकीत लसीला मान्यता देण्यात येऊ शकते का, असा प्रश्न माध्यमांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी असं कुठलंही आश्वासन देण्यास नकार दिला होता. मात्र स्पष्ट नकारही त्यांनी दिला नव्हता. या बैठकीत भारत बायोटेककडून तयार करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिनला आपातकालीन वापराच्या यादीत टाकण्याच्या निर्णयाबाबत चर्चा होणार आहे. मात्र इतर अनेक गोष्टींवर याचा निर्णय अवलंबून असणार आहे.

हे वाचा- अंडरवियरमध्ये लपवली सोन्याची पेस्ट, असा फसला ‘OLD STYLE’ तस्करीचा प्रयत्न

लवकर मान्यता मिळण्याची अपेक्षा

भारतात अनेक नागरिकांनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे. अशा नागरिकांच्या परदेश प्रवासावर मर्यादा येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं मान्यता दिलेली नसल्यामुळे जगातील अनेक देशांत कोव्हॅक्सिन घेतलेल्या नागरिकांना प्रवेश मिळत नसल्याचं चित्र आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून मागितले जाणारे सर्व तपशील आम्ही पुरवत असून लवकरच मान्यता मिळण्याची अपेक्षा भारत बायोटेककडून व्यक्त करण्यात आली आहे.

First published:

Tags: Vaccinated for covid 19, Vaccination, Who