• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • Covaxin लसीवर अमेरिकेचीही मोहोर, अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटवर ठरते प्रभावी

Covaxin लसीवर अमेरिकेचीही मोहोर, अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटवर ठरते प्रभावी

Corona Virus In India: अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेनं (National Health Organization) केलेल्या चाचणीत कोव्हॅक्सिन ही लस कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा अशा दोन्ही व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 30 जून: भारतातील कोरानाची दुसरी लाट (Second Wave of Corona) उतरणीला लागून तिसऱ्या लाटेची (Third Wave) शक्यता वर्तवण्यात येत असताना एक दिलासादायक घटना घडली आहे. भारतात संशोधित झालेली आणि भारतातच तयार होणारी कोव्हॅक्सिन (Covaxin) ही लस कोरोनावर अत्यंत प्रभावी (Effective) असल्याचं अमेरिकेनं (America) म्हटलं आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेनं (National Health Organization) केलेल्या चाचणीत कोव्हॅक्सिन ही लस कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा (Alpha and Delta) अशा दोन्ही व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. अँटिबॉडिज तयार कऱण्याची प्रचंड क्षमता आतापर्यत कोव्हॅक्सिनची लस 2.5 कोटींहून अधिक नागरिकांना देण्यात आली आहे. यातील काहींच्या रक्ताचे नमुने अमेरिकेच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले. ही लस घेतल्यानंतर शरीरात अँटिबॉडिज तयार होण्याचं प्रमाण उत्तम असून कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक सर्व घटक त्यातून शरीरात तयार होत असल्याचं अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेनं म्हटलं आहे. जगातील प्रभावशाली लसींच्या यादीत बसण्यासाठी कोव्हॅक्सिन सज्ज असून इतर लसींमध्ये असलेले सर्व गुण या लसीतही असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे. हेही वाचा- राज्यातल्या कोरोना लसीच्या साठ्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती कोव्हॅक्सिन 78 टक्के प्रभावी कोव्हॅक्सिनची लस ही 78 टक्के परिणामकारक असल्याचं आतापर्यंतच्या चाचण्यांमधून स्पष्ट झालं आहे. त्याची परिणामकारक इतर लसींच्या तुलनेत कमी नोंदवण्यात आली असली तरी या लसीची एक खासियत देखील आहे. ही लस इतर लसींपेक्षा किंचित अधिक प्रमाणात अँटिबॉडिज तयार करत असल्याचं दिसून आलं आहे. दुसरं म्हणजे इतर लसींच्या तुलनेत ही लस सुसह्य असल्याचंही सिद्ध झालं आहे. कोव्हॅक्सिन लस घेणाऱ्यांना येणारी रिऍक्शन आणि लस घेतल्यानंतर काही दिवस होणारा त्रास हा इतर लसींच्या तुलनेत कमी असल्याचे अनुभव अनेकांनी नोंदवले आहेत. हेही वाचा- 'ठाकरे सरकार प्रत्येक कामासाठी केंद्राची मंजुरी घेते?', हायकोर्टाचा सवाल अल्फा आणि डेल्टाला करते प्रभावहिन कोरोनाच्या SARS – CoV-2 या मूळ व्हायरसचे B.1.17 (अल्फा) आणि B.1.617 (डेल्टा) असे दोन व्हेरिएंट सध्या जगभर धुमाकूळ घालत आहेत. या दोन्ही व्हेरिएंटचा शरीरातील प्रभाव कमी करण्यासाठी कोव्हॅक्सिन प्रभावी असल्याचं अमेरिकेच्या प्रयोगशाळेत सिद्ध झालं आहे. आगामी तिसऱ्या लाटेत मुख्य भीती ही डेल्टा व्हायरसची आहे. त्यावर कोव्हॅक्सिन प्रभावी ठरत असल्याचं सिद्ध होणं, हा भारतीयांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
  Published by:desk news
  First published: