मुंबई, 11 ऑक्टोबर : जगभरात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. कोरोनावर सुरू असलेल्या संशोधनातून अनेक नवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाचे विषाणू आपलं रुप बदलतात याशिवाय ते कोणत्या गोष्टींवर किती दिवस राहू शकतात याबाबतही नवीन माहिती सातत्याने समोर आली आहे. कोरोनाचा SARS-CoV-2 मानवी त्वचेवर बराच काळ टिकू शकतो. कोरोना विषाणू 9 तासांपर्यंत माणसाच्या त्वचेवर जिवंत राहू शकतो. जो इतर संसर्गजन्य विषाणूंपेक्षा जास्त लांब असतो. एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. इन्फ्लुएंझा ए व्हायरस (IAV) सुमारे 2 तास माणसाच्या त्वचेवर टिकला. जपानमधील क्योटो प्रीफेक्चुरल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबत खुलासा केला आहे. त्वचेवर हा विषाणू खूप जास्तवेळ राहात असल्यानं अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. या विषाणूचा नाश करण्यासाठी हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करत राहाणं आवश्यक आहे. याशिवाय हाताचा जो भाग झाकलेला नसेल त्यावर सॅनिटायझर करणं किंवा स्वच्छ साबणानं धुणे आवश्यक आहे. SARS-CoV-2 हा विषाणू अस्थिर आहे. त्याचं रुप बदलणारं आहे. त्यामुळे कोरोनाच्या विषाणूंपासून आपल्याला सतर्क राहाणं खूप गरजेचं असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
India's #COVID19 tally crosses 70-lakh mark with a spike of 74,383 new cases & 918 deaths reported in the last 24 hours.
— ANI (@ANI) October 11, 2020
Total case tally stands at 70,53,807 including 8,67,496 active cases, 60,77,977 cured/discharged/migrated cases & 1,08,334 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/Ynu0wOodzU
कोरोना व्हायरसचे SARS-CoV-2 विषाणू साधारण 9 तास तर IAVमध्ये हे विषाणू 2 तास त्वचेवर राहतात त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढण्याचा धोका अधिक असतो. भारतात काय आहे कोरोनाची स्थिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 70 लाखहून अधिक कोरोनाग्रस्तांचा आकडा झाला आहे. गेल्या 24 तासांत 74 हजार 383 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 918 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 8 लाख 67 हजार 496 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 60,77,977 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.