cनवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: कोरोना (Coronavirus) साथीच्या रोगापासून बचाव करण्यासाठी केंद्र सरकारने COVID-19 लसीकरणासाठी रोडमॅप तयार केला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कोरोना लसीकरणाचा संपूर्ण खर्च सरकार (Covid-19 Vaccine plan) उचलणार आहे. तसंच याबाबत रोडमॅप आगामी बजेट 2021 (Budget 2021) मध्ये जाहीर केला जाऊ शकतो. या अहवालाच्या मते सरकारने यासंदर्भात संपूर्ण आराखडा तयार केला आहे आणि अॅस्ट्रजेनिकामधून मोठ्या प्रमाणात लस घेण्याची तयारी आहे.
असा अंदाज वर्तवला जात आहे की, देशातील एका नागरिकाला कोरोना लस देण्यासाठी 6 ते 7 डॉलर अर्थात जवळपा 500 रुपयांएवढा खर्च येईल. यामुळेच 130 कोटी लोकांना कोरोना लस देण्यासाठी सरकारने 500 अब्ज रुपयांचे बजेट निश्चित केले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी या अर्थसंकल्पाची व्यवस्था केली जाईल. त्यानंतर लस देताना निधीची कमतरता भासणार नाही.
(हे वाचा-31 डिसेंबरपर्यंत उड्डाण घेणार नाहीत आंतरराष्ट्रीय विमानं, DGCAचे आदेश)
फेब्रुवारी अखेरपर्यंत लसीकरण सुरू करण्याचे लक्ष्य -
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, लसीकरणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलण्याची तयारी करत आहे. या संदर्भात सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली जाऊ शकते. लसीकरण फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.
कोरोना व्हायरसची ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या अंतर्गतच व्हॅक्सिनचा संपूर्ण खर्च सरकार करेल, अशा योजनेवर काम सुरू आहे. अशी माहिती मिळते आहे की याबाबत सहमती मिळाली असून, अर्थसंकल्पात घोषणा केली जाऊ शकते.
#BreakingNews | सरकार कोरोना टीकाकरण का खर्च उठाएगी,फरवरी आखिर तक टीकाकरण शुरू करने का लक्ष्य - REUTERS#Corona | #Covid19 | #CovidVaccine pic.twitter.com/3orJnHHGZc
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) November 26, 2020
आज संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढत आहे. लवकरात लवकर यावर लस उपलब्ध होईल याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. जगभरात एकूण 150 हून जास्त कोरोना व्हॅक्सिन्सवर रिसर्च आणि ट्रायल केली जात आहे. आतापर्यंत कोणत्याही व्हॅक्सिनला जागतिक वापरासाठी मान्यता देण्यात आली नाही आहे. केवळ रशियाने ऑगस्टमध्ये Sputnik V या लशील मान्यता दिली होती. या लशीच्या फेज-3 चाचणीच्या निकालाची वाट जागतिक स्तरावर पाहिली जात आहे. भारतातही कोविडच्या 3 लशींची फेज 2/3 ट्रायल सुरू आहे. यापैकी दोन लशी भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus