मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

अलर्ट! लहान मुलांमध्ये दिसला कोरोनाचा धोकादायक सिंड्रोम MIS-C, ही आहेत लक्षणं

अलर्ट! लहान मुलांमध्ये दिसला कोरोनाचा धोकादायक सिंड्रोम MIS-C, ही आहेत लक्षणं

तुमच्या मुलांमध्ये कोरोनाची ही नवी लक्षणं दिसत असतील तर लगेच डॉक्टरांकडे जा.

तुमच्या मुलांमध्ये कोरोनाची ही नवी लक्षणं दिसत असतील तर लगेच डॉक्टरांकडे जा.

तुमच्या मुलांमध्ये कोरोनाची ही नवी लक्षणं दिसत असतील तर लगेच डॉक्टरांकडे जा.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 08 सप्टेंबर : जगभरातील कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) संख्या काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. यातच आता लहान मुलांमध्ये कोरोनाच्या संबंधित एक धोकादायक सिंड्रोम (syndrome) म्हणजेच लक्षणं दिसत आहेत. मुलांमध्ये याआधी कोरोनाची सोम्य लक्षणं दिसून येत होती, तसेच, मुलांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होणारे मृत्यूही खूप कमी होते. मात्र आता स्वीडन, अमेरिका, स्पेन आणि ब्रिटननंतर भारतीय मुलांमध्ये एक जीवघेणा मल्टीसिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम आहे. याला MIS-C असेही म्हटले जाते.

वाचा-COVID-19: कोरोनावरच्या या 5 लशींपासून जगाला आहे सर्वात जास्त आशा

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात 22 ऑगस्टपर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये 20 वर्षांच्या खालील मुलांची संख्या केवळ 1.22% होती. अशा परिस्थितीत अजूनही MIS-C भारतात मर्यादित आहे.

वाचा-असं काय घडलं की, देशातील सर्वात मोठं Covid Care सेंटर बंद करण्याचा घेतला निर्णय

MIS-C ची लक्षणं

MIS-C मध्ये, रुग्णाला कावासाकीसारखी लक्षणं देखील आढळतात, यात मुलांना ताप, शरीराच्या अवयवांचे काम थांबणे, अवयवांमध्ये जास्त सूज येणे यासारख्या समस्या आहेत. यात रक्तवाहिन्यांचा सूज, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचा धक्का आणि एकाधिक अवयवांचे नुकसान यांचाही समावेश आहे.

वाचा-भारतात Oxford पाठोपाठ दिली जाणार रशियन कोरोना लस; पाहा कधीपासून होणार ट्रायल

स्वीडन आणि इटलीमधील संशोधकांनी निरोगी मुलांमध्ये रोगप्रतिकारक पेशी, साइटोकिन्स आणि ऑटो-अँटीबॉडीजच्या यंत्रणेचे विश्लेषण केले आहे. त्यापैकी, कोव्हिड-19 पूर्वी कावासाकी आजाराच असलेली मुलं, कोरोना असलेली मुलं आणि MIS-C असलेल्या मुलांना मल्टिपल ऑटोअॅन्टीबॉडीजमुळे MIS-C पसरल्याचे आढळले. संशोधनात असेही आढळले आहे की ताप, डोळे येणे, पाय सूज येणे, घश्यात सूज येणे आणि पुरळ या दोन्ही आजारांमध्ये समान आहेत. तर, MIS-C मध्ये डोकेदुखी, ओटीपोटात वेदना, उलट्या होणे, घसा खवखवणे आणि खोकला येणे ही सामान्य लक्षणं आहेत.

First published:

Tags: Corona, Corona virus in india