Home /News /national /

भाजप सरकारचा मोठा निर्णय; या राज्यात आता मोफत होणार कोरोनाची टेस्ट

भाजप सरकारचा मोठा निर्णय; या राज्यात आता मोफत होणार कोरोनाची टेस्ट

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची चाचणी होणं आवश्यक आहे, यासाठी या राज्यातील सरकारने हा निर्णय घेतला आहे

    भोपाल, 8 सप्टेंबर : देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. अशात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्या वाढविण्याची मागणी केली जात आहे. अशातच मध्य प्रदेशमध्ये कोरोना व्हायरस चाचणीसाठी (COVID-19 Test) नागरिकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यापुढे मध्य प्रदेशात कोरोना संसर्गाची तपासणी मोफत करण्यात येईल. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (CM Shivraj Singh Chouhan) यांच्या अध्यक्षतेत आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत सरकारने हा निर्णय़ घेतला आहे. संपूर्ण प्रदेशात मोफत कोरोना टेस्ट करण्यासाठी फिव्हर क्लीनिकची संख्या वाढविण्यात येणार आहे. याशिवाय प्रदेशात ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवून 3700 पर्यंत करण्यात येईल. याशिवाय प्रदेशात ऑक्सिजन बेड्सची संख्या 11700 पर्यंत करण्यात येणार आहे. दुसरीकडे सरकारने 700 आयसीयू बेड्स वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. हे ही वाचा-COVID-19: कोरोनावरच्या या 5 लशींपासून जगाला आहे सर्वात जास्त आशा शिवराज सरकारच्या निर्णयानुसार राज्यात कोरोना व्हायरस महासाथीवर नियंत्रण आणण्यासाठी रुग्णालयात बेड्स वाढविण्यात येत आहे. याअंतर्गत ग्वालिअर आणि जबलपूरमध्ये बेड्सची संख्या सर्वात वाढविण्यात येईल. कॅबिनेटच्या बैठकीत सरकारने कोरोना संसर्गासाठी प्रदेशभरात जागरुकता अभियान चालविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नगरीय आणि पंचायत विभाग, शहर, आणि गावात प्रचार अभियान सुरू करण्यात येईल. सरकारने दावा केला आहे की सध्या 30000 जनरल बेड्स आहेत.  याची संख्या वाढविल्याने रुग्णांवर उपचार करणे सोपे जाईल. देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्या 42 लाख 80 हजार 423 झाली आहे. असे असले तरी आज गेल्या काही दिवसांच्या तुलनेत नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. आज एका दिवसात 75 हजार 809 नवीन रुग्णांची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांपासून सतत 90 हजारहून अधिक रुग्ण सापडत असताना आजची आकडेवारी दिलासा देणारी आहे. तर, आज 1133 रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात एकूण 72 हजार 775 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, निरोगी झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. 24 तासात रेकॉर्ड ब्रेक 74 हजार 123 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, एकूण निरोगी रुग्णांची संख्या 33 लाख 23 हजार 951 आहे. तर, देशात 8 लाख 83 हजार 697 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india, Madhya pradesh

    पुढील बातम्या