तेलंगणा, 26 ऑगस्ट : एकीकडे जगभरातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे कोरोना लस (Corona Vaccine) शोधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र आता कोरोना लशीबाबत एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनंतर कोरोनाची लस किती सुरक्षित आहे? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तेलंगणा सरकारनं आज राज्यात दोन असे कोरोना रुग्ण सापडले आहेत, ज्यांना याआधीही कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते निरोगीही झाले होते, मात्र आता पुन्हा हे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.
मुख्य म्हणजे तेलंगणामधील हा रिपोर्ट समोर येण्याच्या एक दिवस आधी हाँगकाँगच्या संशोधकांनीही असा दावा केला होता की, निरोगी रुग्णाला पुन्हा कोरोना झाल्याचे प्रकरण सापडले आहे. त्यामुळे एकदा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णात रोगप्रतिकारक शक्ती आहे, असे नाही. म्हणजेच जगभरात तयार होत असलेल्या कोरोना लस 100 टक्के संरक्षणाची हमी देत नाहीत?
वाचा-मुंबईत कोरोनासंदर्भात धक्कादायक माहिती, 11287 पॉझिटिव्ह रुग्णांना लक्षणं नाहीत!
अँटीबॉडीजचा खेळ
तेलंगणा सरकारने सर्वसामान्यांना जास्तीत जास्त काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री एटेला राजेंडर म्हणाले की, कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोनाची लागण होणार नाही याची शाश्वती नाही. पहिल्यांदा संक्रमण झालेल्या व्यक्तीच्या शरीरात पुरेसे अँटीबॉडीज विकसित होत नाही त्यांना पुन्हा कोरोना होण्याचा धोका असतो.
वाचा-...म्हणून देशात वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; आताच व्हा सावध! ICMR ने दिला इशारा
भारतात कधी येणार कोरोना लस?
लवकरात लवकर कोरोना लस (Corona Vaccine) मिळण्याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. यासाठी भारत सरकारही प्रयत्नशील आहे. भारतात सध्या तीन कोरोना लशींचं ट्रायल सुरू आहे. दरम्यान आता रशियाच्या लशीसाठीदेखील भारत प्रयत्नशील आहे. रशिया आणि भारतामध्ये कोरोना लशीबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आयसीएमआरने (ICMR) दिली आहे. या लशीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होत असल्याने भारत जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.