मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Plant based COVID-19 vaccine Covifenz: वनस्पतीपासून तयार केलं गेलं आहे हे Vaccine! कोरोनाच्या सर्व व्हेरियंटवर ठरणार प्रभावी

Plant based COVID-19 vaccine Covifenz: वनस्पतीपासून तयार केलं गेलं आहे हे Vaccine! कोरोनाच्या सर्व व्हेरियंटवर ठरणार प्रभावी

वनस्पतींवर आधारित (Plants based vaccine) ही पहिली लस ठरली आहे. या लशीचं नाव कोव्हिफेन्झ (Covifenz) असं असून, कॅनडा सरकारने (Canada Government) या वनस्पतींवर आधारित लशीला मान्यता दिली आहे.

वनस्पतींवर आधारित (Plants based vaccine) ही पहिली लस ठरली आहे. या लशीचं नाव कोव्हिफेन्झ (Covifenz) असं असून, कॅनडा सरकारने (Canada Government) या वनस्पतींवर आधारित लशीला मान्यता दिली आहे.

वनस्पतींवर आधारित (Plants based vaccine) ही पहिली लस ठरली आहे. या लशीचं नाव कोव्हिफेन्झ (Covifenz) असं असून, कॅनडा सरकारने (Canada Government) या वनस्पतींवर आधारित लशीला मान्यता दिली आहे.

    मुंबई, 01 मार्च: सध्या जगभरात कोरोनावर (Coronavirus) प्रभावी ठरु शकतील असे उपचार आणि लशीच्या (Coronavirus Vaccine) अनुषंगाने संशोधन सुरु आहे. गेल्या सुमारे दीड वर्षाच्या कालावधीत अनेक देशांनी कोरोना लशींवर संशोधन केलं असून, लसीकरण (Vaccination) मोहीमही सुरू केली आहे. भारतात प्रामुख्यानं कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड (Covaxin and Covishield) या दोन लशी नागरिकांना दिल्या जात आहेत. आता लशीच्या अनुषंगाने आणखी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. शास्त्रज्ञांना वनस्पतीपासून लशीची निर्मिती करण्यात यश आलं असून, वनस्पतींवर आधारित (Plants based vaccine) ही पहिली लस ठरली आहे. या लशीचं नाव कोव्हिफेन्झ (Covifenz) असं असून, कॅनडा सरकारने (Canada Government) या वनस्पतींवर आधारित लशीला मान्यता दिली आहे.

    विविध रसायनांपासून किंवा अन्य घटकांपासून लस बनवली जात असल्याचं आपण ऐकलं होतं. पण आता शास्त्रज्ञांना कोरोनाविरूद्ध वनस्पतींपासून लस तयार करण्यात यश आलं आहे. वनस्पतींवर आधारित ही जगातली पहिली लस ठरली आहे. कॅनडा सरकारने या लशीला मान्यता दिली आहे. कॅनडात तयार झालेली ही पहिली लस आहे. मित्सुबिशी केमिकल, बायोफार्मा कंपनी, मेडिकागो आणि ग्लॅक्सो स्मिथक्लाइन या कंपन्यांनी ही लस विकसित केली आहे.

    हे वाचा-ओमिक्रॉनपेक्षा धोकादायक त्याचा 'धाकटा भाऊ' BA.2, काय आहे तज्ज्ञांचा इशारा?

    कॅनडामध्ये ही लस 18 ते 64 वर्ष वयोगटातील लोकांना दिली जाईल. अन्य लसींप्रमाणे या लशीचाही दुसरा डोस (Second Dose of Coronavirus vaccine) नागरिकांना दिला जाईल. या लशीच्या दोन डोसमध्ये 21 दिवसांचे अंतर असेल. 64 पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींवर या लशीचा काय आणि कसा परिणाम होतो, हे पाहण्यासाठी अद्याप संशोधन सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एका वृत्तानुसार, ही लस घेतल्यानंतर रुग्णांमध्ये काही दुष्परिणाम दिसू शकतात. यात ताप येणं, सर्दी होणं, डायरिया, संधिवात, स्नायूंमध्ये वेदना आणि खोकल्याचा समावेश आहे. लस घेतल्यानंतर काही तासापर्यंत ही लक्षणं दिसून येऊ शकतात.

    या लशीमध्ये वनस्पतीचे असे कण आहेत की जे शरीरात बनावट स्पाइक प्रोटिन (Spike Protein) तयार करतात. शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती हे प्रोटिन काढून टाकतं. त्यानंतर शरीरात या प्रथिनाविरुद्ध अँटिबॉडी तयार होऊ लागतात. अशाप्रकारे विषाणू संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी रोगप्रतिकारक यंत्रणा सतर्क होते.

    हे वाचा-कोरोनाव्हायरसवर भारी ठरले बॅक्टेरिया; कोव्हिडशी लढण्याचा नवा मार्ग सापडला

    'डेलीमेल'ने दिलेल्या वृत्तानुसार, या लसीची 18 ते 64 वर्ष वयोगटातील नागरिकांवर मानवी चाचणी घेतली गेली. या चाचणीदरम्यान ही लस कोरोनाच्या सर्व व्हेरियंट (Coronavirus Variant) विरोधात 71 टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं. विशेषतः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कहर करणाऱ्या डेल्टा व्हेरियंटविरुद्ध ही लस 75 टक्के प्रभावी ठरल्याचं दिसलं. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या लसींच्या यादीत कोव्हिफेन्झ या वनस्पतीवर आधारित लसीचा समावेश झाला आहे.

    First published:

    Tags: Canada, Corona, Corona vaccination, Corona vaccine, Corona vaccine in market