मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /ओमिक्रॉनपेक्षा अधिक धोकादायक त्याचा 'धाकटा भाऊ' BA.2 व्हेरियंट, काय आहे तज्ज्ञांचा इशारा?

ओमिक्रॉनपेक्षा अधिक धोकादायक त्याचा 'धाकटा भाऊ' BA.2 व्हेरियंट, काय आहे तज्ज्ञांचा इशारा?

नवीन अभ्यासानुसार, ओमिक्रॉनचा BA.2 हा दुसरा व्हेरियंट आधीच्या BA.1 या व्हेरियंटपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं समोर आलं आहे. ओमिक्रॉनच्या BA.2 या व्हेरियंटला लिटल ब्रदर ऑफ ओमिक्रॉन (Little Brother of Omicron BA.2) म्हणून ओळखलं जातं.

नवीन अभ्यासानुसार, ओमिक्रॉनचा BA.2 हा दुसरा व्हेरियंट आधीच्या BA.1 या व्हेरियंटपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं समोर आलं आहे. ओमिक्रॉनच्या BA.2 या व्हेरियंटला लिटल ब्रदर ऑफ ओमिक्रॉन (Little Brother of Omicron BA.2) म्हणून ओळखलं जातं.

नवीन अभ्यासानुसार, ओमिक्रॉनचा BA.2 हा दुसरा व्हेरियंट आधीच्या BA.1 या व्हेरियंटपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं समोर आलं आहे. ओमिक्रॉनच्या BA.2 या व्हेरियंटला लिटल ब्रदर ऑफ ओमिक्रॉन (Little Brother of Omicron BA.2) म्हणून ओळखलं जातं.

पुढे वाचा ...

    न्यूयॉर्क, 25 फेब्रुवारी: आतापर्यंतच्या सर्व कोरोना विषाणूंच्या प्रकारांमध्ये (Corona Variant Omicron) ओमिक्रॉन हा सर्वात वेगाने पसरणारा आणि सर्वांत धोकादायक व्हेरियंट मानला जात होता. पण आता नवीन अभ्यासानुसार, ओमिक्रॉनचा BA.2 हा दुसरा व्हेरियंट आधीच्या BA.1 या व्हेरियंटपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं समोर आलं आहे. ओमिक्रॉनच्या BA.2 या व्हेरियंटला लिटल ब्रदर ऑफ ओमिक्रॉन (Little Brother of Omicron BA.2) म्हणून ओळखलं जातं. सध्या जगभरात याचेच सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत.

    ओमिक्रॉनच्या बीए.2 व्हेरियंटचा (BA.2) उगम कोठून झाला याबद्दल दोन मतप्रवाह आहेत. सर्वांत प्रथम तो ऑस्ट्रेलियामध्ये (Coronavirus Australia update) सापडल्याचं म्हटलं जातं तर एका मतप्रवाहानुसार भारतात (Coronavirus in India) तो सर्वांत आधी सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. तर बीए.1 (BA.1) सर्वांत आधी दक्षिण आफ्रिकेत (South Africa Corona Update) आढळून आला होता. सर्वांत वेगानं पसरणारा हा व्हेरियंट तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरला असला तरी सध्या जगभरात BA.2 मुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण जगातील सुमारे 50 देशांमध्ये याचा संसर्ग फैलावला असून, जगातील प्रत्येक 5 पैकी एकाला याचा संसर्ग होत आहे. म्हणजेच, एकूण लोकसंख्येच्या सुमारे 20 टक्के संख्येला ओमिक्रॉनच्या BA.2 या व्हेरियंटनं ग्रासलं आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटना अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं (WHO) दिली आहे.

    हे वाचा-कोरोनाव्हायरसवर भारी ठरले बॅक्टेरिया; कोव्हिडशी लढण्याचा नवा मार्ग सापडला

    तज्ज्ञांच्या मते ओमिक्रॉनचा BA.2 हा व्हेरियंट BA.1 पेक्षा 30 टक्के अधिक संसर्गजन्य आहे. ब्रिटन आणि डेन्मार्कमधील अलीकडील अभ्यासावरून हा व्हेरियंट ओमिक्रॉनपेक्षा अधिक वेगाने पसरत आहे. त्यामुळेच त्यावर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अर्थात यामुळे गंभीर स्थिती निर्माण होण्याचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे चिंतेचं कारण नसल्याचं शास्त्रज्ञानी म्हटलं आहे. कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ सस्कॅचेवानमधील विषाणूतज्ज्ञ (Virologist) अँजेला रासमुसेन यांच्या मते, 'BA.2 चा संसर्ग झपाट्याने वाढला आहे. परंतु लोकांच्या रुग्णालयात दाखल होण्याचं किंवा त्यामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण अजूनही कमी आहे. त्यामुळे काळजी करण्याची स्थिती नाही.'

    हे वाचा-मोठी बातमी: आता 2 ते 6 वर्षांच्या मुलांना लवकरच मिळणार Coronaची लस

    BA.2 संसर्गाची माहिती सर्वांत आधी दक्षिण आफ्रिकेतून मिळाली आहे. तिथं BA.2 मुळे कोरोना संसर्गाचा दर 27 टक्क्यांवरून 86 टक्क्यांवर गेला आहे. परंतु रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या केवळ 3.6 टक्के आहे. तिथं BA.1मुळे पसरलेल्या संसर्गादरम्यानही रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांची संख्या 3.4 टक्के म्हणजे जवळपास आताइतकीच होती. BA.2च्या संसर्गाची अशी आकडेवारी डेन्मार्कमधूनही (Denmark) आली आहे. BA.2 मुळे कोणत्याही व्यक्तीला पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता असते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला असून, BA.2 प्रमाणे BA.1 वरही लसीपासून मिळणारी प्रतिकारशक्ती प्रभावी ठरत नाही. त्यामुळे तो कोणालाही पुन्हा संक्रमित करू शकतो. म्हणूनच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे, असं डेन्मार्कच्या स्टेटन्स सिरम इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Corona, Omicron