जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / हे' कार्ड असेल तरच मिळणार Corona vaccine, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले संकेत

हे' कार्ड असेल तरच मिळणार Corona vaccine, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले संकेत

हे' कार्ड असेल तरच मिळणार Corona vaccine, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले संकेत

जागतिक लसीकरण कार्यक्रमात वापरल्या जाणाऱ्या लशींपैकी 60 टक्के लस भारतात तयार केली जात आहे, याची आठवणही पंतप्रधानांनी करून दिली.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून घोषणा केली होती की, देशातील प्रत्येक नागरिकाला राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानांतर्गत हेल्थ कार्ड (Health Card) दिले जाईल. आता दोन महिन्यांनंतर पंतप्रधानांनी पुन्हा ‘लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी डिजिटल हेल्थ आयडी वापरला जाईल’ असे संकेत दिले आहेत. ‘ग्रॅन्ड चॅलेंज’ च्या वार्षिक सभेला संबोधित करताना आपल्या उद्घाटन भाषणात मोदी म्हणाले की, कोरोना संसर्गात लस विकसित करण्याच्या बाबतीत आपण आघाडीवर आहोत आणि काही लशींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. पंतप्रधान म्हणाले की, ‘देशातील अनुभव आणि प्रतिभा संशोधनाच्या बाबतीत भारत जागतिक आरोग्य सेवांच्या केंद्रस्थानी असेल आणि इतर देशांना मदत करायला आवडेल’. जागतिक लसीकरण कार्यक्रमात वापरल्या जाणाऱ्या लशींपैकी 60 टक्के लस भारतात तयार केली जात आहे, याची आठवणही पंतप्रधानांनी करून दिली. वाचा- कोरोना रुग्ण बरे झाले पण…; डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांबाबत चिंताजनक माहिती समोर डिजिटल हेल्थ आयडी कार्डचा वापर पंतप्रधान म्हणाले की, डिजिटल हेल्थ आयडीसह डिजिटल नेटवर्कचा वापर करण्यासाठी एका वितरण सिस्टमवर काम केले जात आहे. याचा वापर करून नागरिकांना लसीकरण केले जाईल. पंतप्रधान म्हणाले की, ‘भारतातील लोकांनी आणि विविधतेने नेहमीच सर्वांना आकर्षित केले आहे. आपला देश अमेरिकेच्या लोकसंख्येच्या चौपट आहे. आपली बरीच राज्ये युरोपियन देशांइतकीच आहेत. भारतात कोव्हिड-19चा मृत्यूदर खूपच कमी आहे. दुसरीकडे दररोज नवीन रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. भारताचा रिकव्हरी रेट 88 टक्के असून हा सर्वात जास्त आहे. हे घडले कारण जेव्हा भारतात शंभर प्रकरणं होती, तेव्हा लॉकडाऊन स्वीकारणार्‍या पहिल्या देशांपैकी भारत एक होता. वाचा- GOOD NEWS! ‘या’ तारखेला भारत कोरोनामुक्त होणारच, सरकारी पॅनलचा दावा असे काम करणार हेल्थ कार्ड याआधी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी भाषणात डिजिटल कार्डचादेखील उल्लेख केला. ते म्हणाले की, ‘प्रत्येक भारतीयाला एक हेल्थ कार्ड दिले जाईल. हे कार्ड प्रत्येक भारतीयांच्या आरोग्य खात्याप्रमाणे कार्य करेल. यात तुमची प्रत्येक टेस्ट, रोग, कोणत्या डॉक्टरकडून कोणतं औषध घेतलंत, त्याचे निदान काय आले, केव्हा घेतले, त्याचे रिपोर्ट काय आले ही सर्व समाविष्ट केली जाईल. डॉक्टरांशी भेट घेण्याची वेळ असो, पैसे जमा करणे, दवाखान्यात प्रिस्क्रिप्शन मिळवण्यासाठी गर्दी असो, या सर्व समस्या नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या माध्यमातून अनेक त्रासातून मुक्तता प्राप्त होईल आणि प्रत्येक नागरिक उत्तम आरोग्यासाठी योग्य निर्णय घेण्यास सक्षम असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात