मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Coronavirus Update : गेल्या 24 तासांत राज्यातील रुग्णसंख्येत मोठी घट; मृत्यूचा आकडा मात्र चिंताजनक

Coronavirus Update : गेल्या 24 तासांत राज्यातील रुग्णसंख्येत मोठी घट; मृत्यूचा आकडा मात्र चिंताजनक

Coronavirus Update : मुंबईतील रुग्णसंख्या आणि मृत्यूचा आकडा कमी होत असल्यामुळे येत्या 1 जूनपासून मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 29 मे : राज्यात कोरोना (Maharashtra Corona Update) रुग्णसंख्येत झपाट्याने घट होत आहे. मात्र असे असले तरी मृत्यूच्या संख्येत नियंत्रण मिळवणे कठीण जात आहे. राज्यात आज 20 हजार 295 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून गुरुवारी (27 मे) ही संख्या 21 हजार 273 इतकी होती. गेल्या दोन दिवसात रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. आज तब्बल 31 हजार 964 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर गेल्या 24 तासात 444 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Maharashtra death count increasing)

27 मे रोजी हीच संख्या 425 इतकी होती. यावरुन गेल्या दोन दिवसात मृतांची संख्या वाढली आहे. सध्या राज्यात 2 लाख 46 हजार सक्रिय रुग्ण असून बरं होण्याचं प्रमाण 93.46 टक्के इतका आहे. तर दुसरीकडे मृत्यूचं प्रमाण 1.63 टक्के आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूची संख्या जास्त असल्याचं दिसतं. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. येत्या 1 जूननंतर रेड झोन व्यतिरिक्त इतर भागात लॉकडाऊन शिथिल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र असे असले तरी नागरिकांनी निष्काळजीपणा न करता योग्य ती काळजी घ्यावी. गरज असेल तरच घराबाहेर पडावे.

हे ही वाचा-Corona मुंबई, पुणे नियंत्रणात, इतर जिल्ह्यांचे आकडे चिंताजनक, नगरमध्ये 35 मृत्यू

दरम्यान 10 जूननंतर जिल्हा बंदी उठविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे 1 जून पासून रुग्णसंख्या शिथिल होण्याची शक्यता आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 1359 जणं कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत रुग्ण दुपटीचा वेग 399 दिवसांवर गेला आहे. मुंबईत आज 1048 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Maharashtra