इंदूर, 23 मे : देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. जवळपास आरोग्य सेवापासून सामान्य मजुरांपर्यंत सगळ्यांचा याचा धोका जाणवत आहे. कोरोना झाला तरी जगण्याची जिद्द न सोडलेल्या 100 वर्षांच्या आजींनी ही लढाई यशस्वीपणे जिंकली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर इथे 100 वर्षांच्या चंदाबाई परमार यांना 10 मे रोजी कोरोना झाल्याचं समजलं. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्या इंदूरच्या नेहरूनगरमध्ये राहतात. त्यांच्यावर अरविंदो रुग्णालयात उपचार सुरू होते. या आजीच्या मुलाचा कोरोनामुळे 4 मे रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर कुटुंबीयांच्या टेस्ट करण्यात आल्या 6 जणांना कोरोना असल्याचं समोर आलं होतं. त्यामध्ये आजींचा समावेश होता. हे वाचा- मजुरांचे हाल थांबेनात! मुंबईहून निघालेली एक्स्प्रेस गोरखपूरऐवजी पोहोचली ओडिशात
चंदाबाई यांचे पहिले दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह तर उपचारानंतर तिसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला. 100 वर्षांच्या आजींनी कोरोनासमोर हार मानली नाही. जगण्याची जिद्द ठेवली आणि कोरोनाशी लढण्यासाठी मन घट्ट केलं. उपचाराला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांना 14 दिवसांत घरी सोडण्यात आलं. शंभर वर्षांच्या या आजींनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्यानंतर घरी येताना त्यांचं नेहरुनगरमधील रहिवाशांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केलं. आजींच्या जिद्दीचं कौतुकही देशभरात होत आहे. तर कोरोनासमोर हार मानणाऱ्यांच्या मनात आजींनी जगण्याची उमेद निर्माण केली आहे. हे वाचा- काही महिन्यांपूर्वी विकत होते सोनं-चांदी, आता सराफाने दुकानात सुरू केली… संपादन- क्रांती कानेटकर

)








