जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Coronavirus: Hong Kong मध्ये पुन्हा कोरोनाचं थैमान; मृतदेह ठेवण्यासाठी कमी पडतेय जागा, पुन्हा Lockdown लागण्याची चिन्ह

Coronavirus: Hong Kong मध्ये पुन्हा कोरोनाचं थैमान; मृतदेह ठेवण्यासाठी कमी पडतेय जागा, पुन्हा Lockdown लागण्याची चिन्ह

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Coronavirus news updates: कोरोनाची तिसरी लाट आता ओसरली असल्याने सर्व निर्बंध हटवण्यात येत आहेत. मात्र, आता त्याच दरम्यान धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

हाँगकाँग, 1 मार्च : महाराष्ट्रासह भारतात आता कोरोनाची तिसरी लाट (Coronavirus third wave) जवळपास ओसरली आहे. यामुळे आता सर्व व्यवहार, सेवा पूर्ववत होताना दिसत आहेत. मात्र, त्याच दरम्यान आता हाँगकाँग **(Hong Kong)**मधून धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. कारण, कोरोनामुळे हाँगकाँगमधील परिस्थिती बिघडत चालली आहे. कोरोना बाधित मृतकांच्या संख्येत इतकी वाढ झाली आहे की मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णालयात जागा शिल्लक राहिली नाहीये. (Coronavirus spike in Hong Kong) हाँगकाँगमधील बहुतांश रहिवाशांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली नाहीये. संसर्गाची वाढती संख्या पाहता स्थानिक अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनची शक्यता नाकारली नाहीये. हाँगकाँग शहरातील सार्वजनिक डॉक्टर्स असोसिएशनचे प्रमुख टोनी लिग म्हणाले, रुग्णालयात अपघात आणि आपत्कालीन कक्षात मृतदेह नेण्याची वाट पहावी लागत आहे. शवागर आणि इतर सुविधा कमी पडताना दिसत आहेत. वाचा :  ओमिक्रॉनपेक्षा धोकादायक त्याचा ‘धाकटा भाऊ’ BA.2, काय आहे तज्ज्ञांचा इशारा? लसीकरणाची संख्या इतर ठिकाणी वाढत असताना हाँगकाँगमध्ये लस न घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, अनेकांनी दुष्परिणामांच्या भीतीने लसीकरणाला नकार दिला आहे. 2020च्या सरकारी आकडेवारीनुसार, हाँगकाँगमध्ये प्रत्येक महिन्यात सरासरी 4 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 71 हजारांहून अधिक आहे. लॉकडाऊन लावण्याचा विचार सोमवारी हाँगकाँगमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं. सोमवारी 34,466 नव्या रुग्णांची नोंद झाली तर मृतकांचाही आकड वाढला. यामुळे लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता आरोग्य अधिकाऱ्यांनी नाकारली नाहीये. यापूर्वी हाँगकाँगमधील स्थानिक नेत्यांनी लॉकडाऊनला अवास्तव म्हटलं होतं. हाँगकाँगमध्ये ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. दैनंदिन बाधितांच्या संख्येत चौपट वाढ होत आहे. वाचा :  कोरोनातून बरं झालेल्यांना जाणवतीये टिनिटसची गंभीर समस्या; वेळीच व्हा सावध शहरातील आरोग्य संरक्षण केंद्राचे प्रमुख वैद्यकीय आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “दर तीन दिवसांनी रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. आम्हाला वाटते की, बाधितांची संख्या वाढतच जाईल.” सोमवारी शहरात 87 लोकांचा मृत्यू झाला त्यापैकी 67 नागरिकांनी कोरोना बाधितांची लस घेतली नव्हती. त्यामुळे आता सरकार अशा उपाययोजना लागू करु शकते की ज्यामुळे नागरिकांना घरी राहण्यास सांगितले जाऊ शकते असंही आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. हाँगकाँगच्या आरोग्यमंत्री सोफिया चॅन यांनी सोमवारी एका रेडिओ कार्यक्रमादरम्यान सांगितले की, लोकांची रेलचेल करण्याची क्षमता कमी करण्यासाठी लॉकडाऊनच्या शक्यतेवर सरकार चर्चा करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात