जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात कोरोना उपचाराबाबत मोठे बदल, महानगरपालिकेने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

पुण्यात कोरोना उपचाराबाबत मोठे बदल, महानगरपालिकेने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 60 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 60 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

आरोग्य यंत्रणेवरीलही ताण वाढला आहे. अशातच पुणे महानगरपालिकेकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 20 जून : पुणे शहरात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. शहरातील ज्या भागांमध्ये यापूर्वी कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता, तेथेही आता कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरीलही ताण वाढला आहे. अशातच पुणे महानगरपालिकेकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लक्षणं नसलेल्या रूग्णांवर यापुढे घरीच उपचार करण्यात येणार आहेत. रूग्णांकडून घरातच राहण्याचं हमीपत्रही घेण्यात येणार आहे. अशा रूग्णांना टेलिमेडिसीनद्वारे उपचार देण्यात येतील. या निर्णयामुळे पालिका आरोग्य यंञणेवरील 25 टक्के ताण कमी होणार आहे. दाट वस्तीबाबत मात्र वेगळा निर्णय एकीकडे पालिकेने लक्षणं नसलेल्या रूग्णांवर यापुढे घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला असला तरीही दाट वस्तीमधील रूग्णांना मात्र कोविड सेंटरमध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘को मॉर्बिड’ रूग्णांवरही हॉस्पिटलमधेच उपचार होईल. याबाबत मनपा आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी माहिती दिली आहे. कोरोनाबाबत महाराष्ट्रासाठी दिलासादायक आकडेवारी महाराष्ट्रात देशातील सर्वात जास्त रुग्ण असले तरी, एक दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 5 दिवसांपासून महाराष्ट्रातील निरोगी रुग्णांचा आकडा हा 50% आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3827 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, 1935 रुग्ण निरोगी झाले. महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या आता 1 लाख 24 हजार 331 झाली आहे. तर, 62 हजार 773 रुग्ण निरोगी झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात