Home /News /national /

'मी हिमालयात होते; सोशल डिस्टन्सिंगही पाळलं आणि तरीही मला कोरोना झाला'

'मी हिमालयात होते; सोशल डिस्टन्सिंगही पाळलं आणि तरीही मला कोरोना झाला'

उमा भारती यांना हिमालयातून आल्यानंतर हलका ताप जाणवत होता आणि त्यांची तब्येत बिघडल्यामुळे कोरोनाची चाचणी करून घेतली.

    भोपाऴ, 27 सप्टेंबर : देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसाला 85 हजारहून अधिक कोरोनाच्या रुग्णांची नोंद होत आहे. राजकारण आणि मनोरंजन विश्वातही कोरोनानं शिरकाव केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याच्या माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करून दिली आहे. उमा भारती यांना हिमालयातून आल्यानंतर हलका ताप जाणवत होता आणि त्यांची तब्येत बिघडल्यामुळे कोरोनाची चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. हे वाचा-Coronavirus पासून बचाव करण्यासाठी लशीसारखं रक्षण करतो मास्क; नवीन माहिती समोर सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मी सर्व नियम पाळून देखील मला यात्रा संपवून आल्यावर 3 दिवस ताप येऊ लागला. त्यावेळी कोरोना टेस्ट करून घेतली आणि ती सकारात्मक आल्याचं भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी सांगितलं आहे. सध्या त्या वंदे मातरम् कुंज इथे क्वारंटाइन सेंटरमध्ये आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानं पुढील निर्णय घेईन, 4 दिवसांनी पुन्हा एकदा कोरोना चाचणी करेन आणि त्यानंतर डॉक्टरांचा सल्ल्यानं निर्णय घेईन अशी माहिती त्यांनी दिली. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली कोरोना चाचणी करावी असं आवाहन त्यांनी ट्वीट करून केलं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: BJP, Madhya pradesh, Uma bharti

    पुढील बातम्या