मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

आता Tata उतरणार कोरोना लसीकरण मोहिमेत; भारतात तिसरी Covid लस आणायची तयारी सुरू

आता Tata उतरणार कोरोना लसीकरण मोहिमेत; भारतात तिसरी Covid लस आणायची तयारी सुरू

टाटा मेडिकल अॅन्ड डायग्नोस्टिक्सने 'कोविड- 19' ची (Covid-19 vaccine) लस भारतात आणण्यासाठी मॉडर्ना इंक (Moderne Inc) या कंपनीशी प्रारंभिक चर्चा (discussions) सुरू केली असल्याचं म्हटलं जात आहे.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 25 जानेवारी: सध्या देशात कोविड-19 लसीकरणाला (Covid-19 vaccination) सुरुवात झाली आहे. आतापर्यंत देशातील 16 लाखाहून अधिक कोविड योद्धांना कोरोना लस देण्यात आली आहे. सध्या भारत सरकारने सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडीया (SII) आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University) विकसित केलेली कोविशिल्ड (Covishield) आणि भारत बायोटेक (Bhart Biotech) या कंपनीची स्वदेशी  कोव्हॅक्सिन (Covaxin) या दोन लशींच्या वितरणाला परवानगी दिली आहे. आता या लसीकरणाच्या मोहिमेत उतरण्यासाठी टाटा ग्रुप (Tata group) देखील चाचपणी करत असल्याचं समोर आलं आहे. भारतात तिसरी लस आणण्याची तयारी टाटा समूहाने केली आहे. कोरोना लशीसंदर्भात (Covid-19 Vaccine) टाटा ग्रूपने अमेरिकेतल्या मॉडर्ना कंपनीशी (Moderna) बोलणी केल्याचं वृत्त समोर आलं आहे. टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्सने 'कोविड- 19' ची लस भारतात आणण्यासाठी मॉडर्ना इंक या कंपनीशी प्रारंभिक चर्चा सुरू केली असल्याचं म्हटलं जात आहे. त्यासाठी टाटा ग्रूप इंडियाज कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR) या संस्थेसोबत काम करण्याची तयारी दर्शवली असल्याचं वृत इकॉनॉमिक टाइम्सने दिलं आहे. गेल्याच महिन्यात भारत सरकारने कोविड-19 च्या लसीकरणाला आपत्कालीन परवानगी दिली आहे. भारत बायोटेक इंटरनेशनल लिमिटेड आणि भारत सरकारच्या मेडिकल काऊंन्सिल ऑफ रिसर्चद्वारा निर्मित लशीला परवानगी दिली आहे. त्याचबरोबर ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्रॅझेनका पीएलसीकडून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे तयार करण्यात आलेल्या लशीला परवानगी दिली आहे. असं असताना टाटा ग्रुप लसीकरणाच्या मोहिमेत उतरली तर देशातील लसीकरण कमी वेळात पूर्ण होईल. तसेच मॉडर्ना इंक ही भारतातली तिसरी लस ठरेल. पण या लशीसंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. रॉयटर्स माध्यम संस्थेने अमेरिकन कंपनी मॉडर्ना इंक आणि टाटा मेडिकल अॅन्ड डायग्नोस्टिक्सशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. पण अद्याप त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही.
First published:

Tags: Corona vaccine, Vaccination

पुढील बातम्या