मुंबई, 19 जानेवारी : कोरोना नियंत्रणात आला, कोरोना काळातील निर्बंध संपले, चेहऱ्यावरील मास्क हटला सर्वकाही आता सुरळीत झालं आहे. आपणही कोरोना लस घेतली आहे, त्यामुळे आपल्याला काही आता कोरोनाचा धोका नाही. असं समजून तुम्ही निश्चिंत झाला असाल. पण कोरोना लस घेतली म्हणजे तुमची कोरोनातून सुटका झाली असं बिलकुल नाही. नव्या अभ्यासाने आता कोरोना लस घेतलेल्यांचंच टेन्शन वाढवलं आहे. कारण कोरोनाचा नवा व्हेरिएंट कोरोना लस घेतलेल्यांना जास्त संक्रमित करत आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
NYC डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड मेंटल हायजिनने हे संशोधन केलं आहे. ज्यात कोरोनाचा XBB.1.5.1.5 हा व्हेरिएंट सर्वात जास्त वेगाने पसरणारा व्हेरिएंट असल्याचं समोर आलं आहे. XBB.1.5 हा ओमिक्रॉन XBB.1.5.1.5 व्हेरिएंटच्या कुटुंबातील आहे. ओमिक्रॉन BA.2.10.1 आणि BA.2.75 सब व्हेरिएंट्सचा रिकॉम्बिनंट म्हणजे दोन्ही व्हेरिएंटपासून तयार झाला आहे.
धक्कादायक म्हणजे हा इतका खतरनाक आहे की इतर व्हेरिएंट्सच्या तुलनेत हा व्हेरिएंट्स कोरोना लस घेतलेल्यांना आणि ज्यांना कोरोना झाला आहे, त्यांच्यावर जास्त परिणाम करतो आहे, असा दावा एका नव्या संशोधनात करण्यात आला आहे. म्हणजे जर तुम्ही कोरोना लस घेतली असेल तर तुम्हाला कोरोना होण्याचा धोका जास्त आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार हा व्हेरिएंट 38 देशांमध्ये पसरला आहे. अमेरकेतील 82 टक्के कोरोना केसेस याच व्हेरिएंटची आहेत. INSACOG च्या माहितीनुसार भारतात या व्हेरिएंटचे एकूण 26 रुग्ण आहेत. 11 राज्यांमध्ये हे रुग्ण सापडले आहेत. ज्यात महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. महाराष्ट्रात या व्हेरिएंटचे रुग्ण आधीपासूनच आहेत, त्यामुळे तुम्हालाही संक्रमणाचा धोका आहे. त्यामुळे सावध राहा.
हे वाचा - ना अनुभव, ना ट्रेनिंग; 2 महिन्यांपूर्वी बातमी पाहून IAS अधिकाऱ्याने वाचवला नागरिकाचा जीव
हा व्हेरिएंट जास्त गंभीर आजाराचं कारण ठरू शकतो का हे माहिती नाही. पण बुस्टर डोस घेणं हाच बचावाचा सर्वात चांगला मार्ग असल्याचंही संशोधक म्हणाले. शिवाय कोरोनापासून बचावासाठी तुम्ही जे काही बचावासाठी उपाय करत होता ते करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccination, Coronavirus, Health, Lifestyle