• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • या देशातही कोरोनाचा विस्फोट; आता 1 महिन्याचा लॉकडाऊन लावावाच लागला, स्थिती बिकट

या देशातही कोरोनाचा विस्फोट; आता 1 महिन्याचा लॉकडाऊन लावावाच लागला, स्थिती बिकट

गुरुवारपासून (21 ऑक्टोबर) कर्फ्यूसह महिनाभर लॉकडाऊन (monthlong lockdown, including a curfew) लागू केले जाईल. युरोपियन युनियनमध्ये (European Union) सर्वात कमी लसीकरण दर असलेल्या देशांमध्ये लातवियाचाही समावेश आहे.

 • Share this:
  हेलसिंकी, 19 ऑक्टोबर : कोरोनाबाधितांच्या (coronavirus) वाढत्या संख्येमुळं युरोपियन देश लातवियामधील (Latvia) परिस्थिती बिघडत चालली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून (21 ऑक्टोबर) कर्फ्यूसह महिनाभर लॉकडाऊन (monthlong lockdown, including a curfew) लागू केले जाईल. युरोपियन युनियनमध्ये (European Union) सर्वात कमी लसीकरण दर असलेल्या देशांमध्ये लातवियाचाही समावेश आहे. सोमवारी रात्री उशिरा सरकारच्या आपात्कालीन बैठकीनंतर, लातव्हियाचे पंतप्रधान क्रिसजनीस कॅरिन्स म्हणाले की, 21 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान देशात लॉकडाऊन लागू केलं जाईल. यासह, वेगाने पसरणाऱ्या संसर्गाला सामोरे जाण्यासाठी कठोर उपाययोजना अंमलात आणणे आवश्यक आहे. सुमारे 19 लाख म्हणजे साधारणपणे भारतातील ठाण्यासारख्या शहराच्या लोकसंख्येएवढी लातविया या देशाची लोकसंख्या आहे. लातवियाच्या केवळ अर्ध्या लोकसंख्येलाच कोविड -19 लसीचा पूर्ण डोस मिळाला आहे. या देशात कोरोनाबाधितांची संख्या 1,90,000 इतकी नोंद झाली आहे. आपलं सरकार नागरिकांना लसीकरण करण्यास प्रवृत्त करण्यात अपयशी ठरल्याचं कॅरिन्स यांनी कबूल केलंय. हे वाचा - डॉक्टर तरुणीने केली आत्महत्या; कागदावर 200 वेळा लिहिलं ‘आशिष LOVE वैशाली’ या बाल्टिक (Baltic) देशात (बाल्टिक समुद्राच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर वसलेला देश) कोरोना संसर्गानं आतापर्यंत सुमारे 2,900 लोकांचा मृत्यू झाला आहे. हे वाचा - ऑर्डर केलं एक डिलीव्हर झालं भलतंच! आता फक्त एक काम करा आणि Online Shopping मधील हा घोळ टाळा दरम्यान, भारतात लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनाविरुद्ध (Coronavirus) लढाई सुरू आहे. यात लसीकरण (Corona Vaccine) हे कोविड महामारीविरोधात मोठं शस्त्र ठरलं आहे. या मोहिमेत देश लवकरच एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचणार आहे. उद्यापर्यंत कदाचित देशात कोरोना लस घेणाऱ्यांची संख्या 100 कोटींचा आकडा पार करेल. आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवार संध्याकाळपर्यंत देशात 99.06 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. मंगळवारी 40 लाख 34 हजाराहून अधिक डोस देण्यात आलं. यामुळं भारत (India) एक नव्या इतिहासाच्या जवळ पोहोचला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: