कोरोनाग्रस्त आईने Breasfeeding केल्याने बाळाला व्हायरसचा धोका असतो का?

कोरोनाग्रस्त आईने Breasfeeding केल्याने बाळाला व्हायरसचा धोका असतो का?

कोरोनाव्हायरस (Coronavirus) असलेल्या महिलेने बाळाला स्तनपान (Breastfeeding) करणं कितपत सुरक्षित आहे, याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) त्याचं उत्तर दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 30 मार्च :  कोरोनाव्हायरसबाबत (Coronavirus) गरोदर आणि स्तनपान (Breastfeeding) करत असलेल्या महिलांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. कोरोनाग्रस्त महिलेने आपल्या बाळाला स्तनपान केल्याने बाळाला व्हायरसचा धोका आहे का? कोरोनाव्हायरस असल्यास महिला आपल्या बाळाला आपलं दूध पाजू शकते का?, असेच काहीसे प्रश्न तुमच्या मनात असतील तर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) त्याचं उत्तर दिलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कोरोनाग्रस्त महिलेनं बाळाला स्तनपान केल्याने आतापर्यंत कोणताही धोका दिसलेला नाही. ज्या महिलांना आपल्या बाळाला स्तनपान करायचं आहे त्यांनी मनात कोणतीही भीती न बाळगता स्तनपान करावं. मात्र खबरदारी अवश्य घ्यावी.

कोरोनाग्रस्त महिलांनी बाळाला स्तनपान करताना काय काळजी घ्यावी?

आईने नेहमी मास्क घालून राहावं

शरीराच्या स्वच्छता राखावी

बाळाला स्पर्श करण्यापूर्वी हात पाणी आणि साबणाने स्वच्छ धुवावेत.

बाळाला दूध दिल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत

हे वाचा - प्रेग्नन्सीत 'कोरोना' झाल्यास बाळालाही व्हायरसची लागण होते का?

शिवाय गरोदर महिलेमुळे तिच्या गर्भातील बाळाला कोरोनाव्हायरस होण्याचा धोका नाही, हेदेखील याआधी स्पष्ट झालेलं आहे. नवजात बाळांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याची प्रकरणं आल्यानंतर कोरोनाग्रस्त महिलेमुळे तिच्या बाळालाही व्हायरसचा धोका असतो का अशी भीती निर्माण झाली. मात्र अशी अद्याप कोणतीही प्रकरणं दिसली नसल्याचं सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

हे वाचा - CoronaVirus : लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त, UNICEF ने सांगितलं घरात बसून काय करायचं

First published: March 30, 2020, 8:24 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading