नवी दिल्ली, 01 जून : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये (Coronavirus in child) संसर्गाचं प्रमाण जास्त दिसून आलं आहे. शिवाय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे आणि ही लाट लहान मुलांसाठी (Coronavirus in kids) जास्त धोकादायक ठरू शकते, असं सांगितलं जात आहे. याचदरम्यान केंद्र सरकारनेही लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग होण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे आणि नागरिकांना सावध केलं आहे.
जर कोरोनाव्हायरसमध्ये काही बदल झाले, तर मुलांसाठी धोका वाढू शकतो, अशी धोक्याची सूचना नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल (Dr. V. K. Paul) यांनी दिली आहे.
Our focus on childhood #COVID disease is gaining our attention. The pediatric population is generally asymptomatic. They often get infections but their symptoms are minimal or nill. The infection has not taken serious shape in children: Dr. VK Paul, Member (Health), NITI Aayog pic.twitter.com/JyBwbITEVN
— ANI (@ANI) June 1, 2021
व्ही. के. पॉल म्हणाले, "लहान मुलांमध्ये दिसून येणारा कोरोनाचा संसर्ग हा लक्षणंविरहित आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये लक्षणं दिसत नाही. लहान मुलांमध्ये कोरोनाचं गंभीर प्रमाण खूप कमी आहे. पण व्हायरसने आपल्यामध्ये बदल केले तर तो लहान मुलांसाठी धोका वाढू शकतो"
हे वाचा - Black Fungus ने 26 राज्यांत पसरले हातपाय; राज्यातील स्थिती भयानक
"लहान मुलांना जेव्हा कोरोना होता तेव्हा त्यांना ताप, खोकला, सर्दी, न्युमोनिया होतो. कोरोनाची लागण झाल्यानंतर दोन ते सहा आठवड्यांनी त्यांना पुन्हा ताप येतो. त्यांच्या त्वचेवर रॅशेस येतात. डायरिया, उलटीही होऊ शकते", असंही व्ही. के. पॉल यांनी सांगितलं.
कोरोनातून बरी झालेली मुलं MIS-C च्या विळख्यात
लहान मुलांना कोरोना झाल्याची प्रकरणं गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक आहेत. शिवाय लहान मुलांना कोरोनासह मल्टी-ऑर्गन इन्फ्लेमेटरी सिंड्रोमनेही (MIS-C - Multi organ inflammatory Syndrome) विळखा घातला आहे. तीन ते पाच दिवसांपर्यंत सतत ताप, अवयव आणि टिश्यूंना सूज, श्वास घ्यायला त्रास, पोटात तीव्र वेदना, ब्लड प्रेशर कमी होणं, डायरिया, त्वचा, नखांचं रंग निळसर होणं अशी याची लक्षणं आहेत.
लहान मुलांसाठी कोरोना लस
फायझर आणि बायोएनटेकची कोरोना लस (Pfizer corona vaccine) लहान मुलांना देण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. या लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. युरोपिअन मेडिकल एजन्सीने शुक्रवारी ही परवानगी दिली आहे. 12 ते 15 वयोगटातील मुलींना ही लस दिली जाणार आहे.
हे वाचा - मिक्स अँड मॅच लसीकरण फायदेशीर ठरेल का? जाणून घ्या काय सांगतात अभ्यासक
तर भारतात दोन ते 18 या वयोगटातल्या मुलांवर लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या घेण्यासाठी भारत बायोटेकला (Bharat Biotech) भारतीय औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. लवकरच या चाचण्या सुरू होतील. अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या लशीच्याही ट्रायल्स सहा ते 17 या वयोगटासाठी सुरू आहेत; मात्र त्याचा डेटा अद्याप हाती आलेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona patient, Coronavirus, Small child