पालकांनो लक्ष द्या! लहान मुलांमध्ये दिसतायेत Coronavirus ची वेगळी लक्षणं

पालकांनो लक्ष द्या! लहान मुलांमध्ये दिसतायेत Coronavirus ची वेगळी लक्षणं

लहान मुलांमध्ये Coronavirus ची वेगळी लक्षणं दिसत आहेत, याबाबत ब्रिटनच्या (Britain) नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसने (NHS) अलर्ट जारी केला आहे.

  • Share this:

लंडन, 28 एप्रिल : ताप, खोकला, श्वास घेण्यात त्रास ही कोरोनाव्हायरसची लक्षणं (Coronavirus symptoms) आहेत. मात्र लहान मुलांमध्ये (children) कोरोनाव्हायरसची वेगळी लक्षणं दिसू लागलीत. त्यामुळे मुलांकडे विशेष लक्षण देण्याची गरज आहे, असा अलर्ट ब्रिटनच्या (Britain) नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसने (NHS) जारी केला आहे.

नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसने (NHS) दिलेल्या माहितीनुसार,  ICU मध्ये दाखल असलेल्या मुलांमध्ये अशी कित्येक प्रकरणं आहेत, ज्यामध्ये त्यांच्या हृदयाला सूज, उलटी आणि डायरिया अशी लक्षणंही समोर आलीत. अशी लक्षणं दिसणाऱ्या मुलांना जेव्हा रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्यांची प्रकृती खूपच गंभीर होती, त्यांना थेट ICU मध्येच दाखल करावं लागलं. या सर्वांच्या कोरोना टेस्टही करण्यात आले, त्यापैकी काही मुलं कोरोना पॉझिटिव्ह आहेत. डॉक्टरांच्या मते, सर्व वयाच्या लहान मुलांमध्ये अशी लक्षणं दिसू लागलीत. गेले 3 आठवडे अशी प्रकरणं दिसून येत आहेत.

NHS शी संंबंधित डॉक्टरांनी याला सध्या इन्फ्लेमेट्री सिंड्रोम म्हटलं आहे. याचा संबंध कोरोनाव्हायरसशी असू शकतो, असंही ते म्हणाले.

शॉक सिंड्रोम, कावासाकी डिसीज की कोविड-19?

जारी करण्यात आलेल्या अलर्टमध्ये या लक्षणांची तुलना शॉक सिंड्रोम किंवा कावासाकी डिसीजशी करण्यात आली आहे. या दोन्ही आजारात शरीराच्या आतील अवयवांना सूज येते आणि कोरोनाच्या लक्षणाप्रमाणे ताप येतो, श्वास घेण्यात समस्या येते.

मुलांमध्ये कोरोना आणि कावासाकीशी मिळतीजुळती लक्षणं आहे, जे असामान्य आहे आणि त्याची तपासणी सुरू आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं. जोपर्यंत यामागील नेमकं कारण समजत नाही, तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणं योग्य नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

हे वाचा - Coronavirus चं कम्युनिटी संक्रमण तर नाही ना? आता सांडपाण्याची तपासणी होणार

पीडियाट्रिक इन्टेन्सिव्ह केअर सोसायायटीच्या ट्विटनुसार लहान मुलांमध्ये शॉक सिंड्रोम, कावासाकी डिसीज आणि कोविड-19 या तिन्ही आजारांची गंभीर लक्षणं एकत्र दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या पोटात वेदना होणं ही एकप्रकारची एमर्जन्सी आहे.

ब्रिटनमधील बालरोग तज्ज्ञ डॉ. एलिजाबेथ विटेकर यांनी सांगितलं, "अशीच प्रकरणं इटली, स्पेनसाराख्या देशांमध्येही दिसत आहेत, मात्र त्यांच्या संख्या कमी आहे. आतापर्यंत कोरोनाव्हायरसच्या सामान्य लक्षणांमध्ये ताप, श्वास घेण्यात त्रास, कोरडा खोकला होता. मात्र त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं डायरिया, पोटदुखी हीदेखील कोरोनाची लक्षणं आहेत, असं सांगितलं. तर दुसरीकडे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, वास न येणं, चव न लागणं हेदेखील कोरोना संक्रमणाचे संकेत आहेत"

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - खूशखबर! भारत 'या' तारखेपर्यंत मिळवणार कोरोनावर विजय, संशोधकांचा सर्वात मोठा दावा

First published: April 28, 2020, 12:36 PM IST

ताज्या बातम्या