पहिल्यांदा 2004 साली अभय पाटील (Abhay Patil) यांनी विधानसभा निवडणूक जिंकली होती. त्यावेळच्या बागेवाडी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. 2008 साली विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतर बागेवाडी मतदारसंघ रद्द होऊन बेळगाव दक्षिण मतदारसंघ उदयास आला. यानंतर पाटील 2008 ची विधानसभा निवडणूक जिंकले. 2013 मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या संभाजी पाटील यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर पुन्हा 2018 साली ते याच मतदारसंघातून निवडून आले. एकूण तीन वेळा ते या मतदारसंघात आमदार म्हणून कार्यरत आहेत. हे वाचा-Shocking:कोरोनासाठी देवाला सोडलेल्या घोड्याचा मृत्यू, अंत्यसंस्कारात गर्दी बेळगावातून काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. कोरोनाच्या संकटकाळामध्ये कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांनाही परवानगी मिळालेली नाही. एवढंच काय पण अंत्यसंस्काराच्या विधीलाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीलाच परवानही दिली जात आहे. मात्र बेळगावमध्ये घोड्याच्या अंत्यसंस्कारासाठी तोबा गर्दी जमा झाली होती. अंत्यसंस्कारासाठी हजारोंची गर्दी झालेला हा घोडा एका आश्रमाशी संबंधित होता. कोन्नूरच्या जवळ असलेल्या कदासिद्धेश्वर आश्रमातील हा घोडा होता. जगातील कोरोना नष्ट व्हावा म्हणून या घोड्याला सोडून देण्यात आलं. त्यानंतर हा घोडा दोन दिवस गावामध्ये चरत होता. पण अचानक त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याची अंत्ययात्रा पाहण्यासाठी ही हजारोंची गर्दी जमा झाली.Belgaum: कोरोनाला पळवण्याासाठी भाजप आमदारानं केला यज्ञ, शहरातून फिरवला होम पेटलेला गाडा! pic.twitter.com/48xC2eYYwi
— News18Lokmat (@News18lokmat) May 25, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Belgaum, Corona, Corona patient, Corona updates, Coronavirus