नवी दिल्ली, 1 ऑगस्ट: कोरोना साथीच्या (Coronavirus Pandemic) विळख्यात अडकलेलं संपूर्ण जग त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच, कोरोनाचा विषाणू (Corona Virus) सतत आपली रचना बदलत दररोज नवनवीन आव्हानं निर्माण करत आहे. त्यामुळं जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण होत आहे. याचदरम्यान कोरोना विषाणूचा पुढील व्हेरिअंट (Upcoming corona variant) सर्वाधिक घातक (Very deadly) असल्याचा दावा ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी (UK scientists) केला आहे.
संबंधित वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार, कोरोना विषाणूच्या पुढील व्हेरिअंटमुळे तीन पैकी एक जणाचा मृत्यू (One in three can died) होण्याची शक्यता आहे. सायंटिफिक अॅडव्हायझरी ग्रुप फॉर इमेरजन्सीनं याबाबतचा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यामुळे जगभर चिंता वाढली आहे. प्रकाशित केलेल्या संशोधन अहवालात अशी चेतावणी देण्यात आली आहे की, कोरोना विषाणूचा भविष्यात येणारा व्हेरिअंट MERS व्हेरिअंटपेक्षाही अधिक प्राणघातक असू शकतो. या व्हेरिअंटमुळे जगभरात मृत्यू दर जवळपास 35 टक्के इतका राहण्याची शक्यता आहे. या संशोधनात केलेल्या दाव्यानुसार, तीन पैकी एकाचा मृत्यू होणं अटळ आहे.
हेही वाचा-कोरोनाचा नवा व्हेरियंट महाघातक, अमेरिकेकडून शिक्कामोर्तब
प्राण्यांना मारून टाकावं लागणार
कोरोना विषाणूचा भविष्यात येणारा सर्वाधिक घातक व्हेरिअंट हा प्राण्यांपासून येण्याची शक्यता संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांच्या गटानं वर्तवली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा पुढील व्हेरिअंट रोखायचा असेल तर सर्व प्राण्यांना मारावं लागेल, किंवा त्याचं व्यापक प्रमाणावर लसीकरण करावं लागेल, असे दोन उपाय सुचवण्यात आलं आहे. कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिअंट जनावरांपासूनच पसरण्याची शक्यता अधिक असल्याचं संशोधकाचं म्हणणं आहे.
हेही वाचा-कांजण्याप्रमाणेच पसरतोय डेल्टाचा संसर्ग, लसीकरण झालेल्या लोकांनाही धोका?
लसही ठरणार कुचकामी
कोरोना विषाणूचा भविष्यात येणारा व्हेरिअंट हा सध्या अस्तित्वात असणाऱ्या बीटा, अल्फा किंवा डेल्टा व्हेरिअंटचा संयोजन असेल तर कोविड 19 ची लसही यावर कुचकामी ठरू शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनात दिला आहे. जर असं झालं तर जगभर मृत्यूदरात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. भविष्यात येणाऱ्या नवीन व्हेरिअंटचं नाव काय असेल, याबाबतची माहिती संबंधित संशोधनात दिली नाही. पण याला सुपर म्युटेंट व्हेरिअंट म्हटलं गेलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates