जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Corona Virus In Mumbai: मुंबईत चौथी लाट?, 5 दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये 50 टक्क्यांनी वाढ

Corona Virus In Mumbai: मुंबईत चौथी लाट?, 5 दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये 50 टक्क्यांनी वाढ

Corona Virus In Mumbai: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचे रुग्ण (Corona Patients) झपाट्याने वाढत आहेत. राज्यात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी एक हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 07 जून: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचे रुग्ण (Corona Patients) झपाट्याने वाढत आहेत. राज्यात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी एक हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले. सोमवारी 1036 नवीन रुग्ण आढळले. जर आपण गेल्या सात दिवसांची सरासरी पाहिली तर, 26 फेब्रुवारीनंतर जेव्हा कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले तेव्हा हा उच्चांक आहे. पॉझिटिव्हिटी रेट देखील 4.25 टक्के आहे, जो 13 फेब्रुवारीनंतरचा जास्तीत जास्त आहे. याला कोरोनाच्या चौथ्या लाटेची सुरुवात म्हणावी की नाही हे सांगणे घाईचे ठरेल. जोपर्यंत कोणताही नवीन व्हेरिएंट येत नाही, तोवर नवीन लाटेची शक्यता खूप कमी असल्याचं तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे देखील सांगत आहेत की, व्हायरसची तीव्रता जास्त नसल्याने आणि रूग्णांमध्ये रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. 12 तासात दुसरं Encounter, सुरक्षा दलाला यश; दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, कोरोना प्रकरणांमध्ये ही वाढ प्रामुख्याने ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 प्रकारांमुळे झाली आहे, जी अत्यंत महत्त्वाची आहे आणि संसर्गजन्य आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबईतही कोरोना रुग्णांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, पॉझिटिव्ह रूग्णांपैकी केवळ 1 टक्के रूग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. मुंबईत 24,579 खाटा आहेत, त्यापैकी सोमवारी फक्त 185 म्हणजेच 0.74 टक्के भरल्या. ऑक्सिजन सुविधा असलेल्या 4768 खाटांपैकी केवळ 14 (0.29 टक्के) रुग्ण होते. राजेश टोपे म्हणाले की, सोमवारी मुंबईत 676 नवीन रुग्ण आढळले आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यातील एकूण रुग्णांपैकी 60-70 टक्के रुग्ण हे मुंबईतच आढळून येत आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, गेल्या सात दिवसांत मुंबई (67.287%), ठाणे (17.17%), पुणे (7.42%), रायगड (3.36%) आणि पालघर (2%) टक्के रुग्ण आढळले आहेत. या पाच जिल्ह्यांमध्ये दैनंदिन सकारात्मकता दर 3 ते 8 टक्क्यांपर्यंत आहे. फेमस रॅपरची गोळ्या झाडून हत्या, संशयाची सुई Girlfriend च्या दिशेनं महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांमध्ये किती BA.4 आणि BA.5 Omicron प्रकरणे आहेत याची आकडेवारी उपलब्ध नाही. या दोन व्हेरिएटंमुळे दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये कोरोनाची नवी लाट येत आहे. हे अधिक सांसर्गिक आहे असे शास्त्रज्ञ मानतात याचे एक कारण हे आहे की ते शरीरात उपस्थित अँटीबॉडीजपासून बचाव करण्यात अधिक पटाईत आहे. ही वाढती प्रकरणे कोरोनाच्या चौथ्या लाटेचे लक्षण आहेत का? यावर तज्ज्ञांचे असे मत आहे की, भारतातील बहुतांश लोकांमध्ये Omicron च्या BA.2 प्रकारामुळे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे, जी अजूनही कार्यरत आहे. याशिवाय ओमायक्रॉन व्हायरसचा प्रसार नक्कीच जास्त आहे,मात्र त्याच्या रुग्णांची स्थिती कमी गंभीर होते. HT नुसार, महाराष्ट्रातील सर्विलांस अधिकारी आणि महामारी तज्ज्ञ डॉ. प्रदीप आवटे यांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत कोरोना व्हायरसचा पूर्णपणे नवीन प्रकार येत नाही तोपर्यंत चौथी लाट येण्याची शक्यता खूपच कमी आहे. सध्या वाढणारी कोरोना प्रकरणे ही तिसरी लाट आणणाऱ्या ओमायक्रॉनचे सर्व प्रकार आहेत. पुढील काही आठवडे केसेस वाढतील, मात्र नंतर ते कमी होऊ लागतील. Monkeypox चं संक्रमण वेगानं, ‘या’ देशातल्या आकड्यानं वाढवली जगाची चिंता राज्य कोविड टास्क फोर्सचे संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. वसंत नागवेकर यांनी एचटीला सांगितले की, सध्या बहुतेक प्रकरणे अतिशय सौम्य आहेत. याला चौथी लहर म्हणणे खूप घाईचे आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले की, या जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या चाचण्या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना आणि गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क घालून लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. गेल्या आठवड्यात राज्य टास्क फोर्सने मास्क अनिवार्य करण्याचा सल्ला दिला होता. 1 एप्रिलपासून राज्यात मास्कसह काही निर्बंध उठवण्यात आले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात