मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Monkeypox Updates: 'या' देशानं वाढवली जगाची चिंता, Monkeypox चा प्रसार मोठ्या प्रमाणात

Monkeypox Updates: 'या' देशानं वाढवली जगाची चिंता, Monkeypox चा प्रसार मोठ्या प्रमाणात

जे लोक संक्रमित आढळले आहेत त्यापैकी बहुतेक समलैंगिक आणि बायसेक्शुअल (Gay and Bisexual) आहेत. दरम्यान अधिकाऱ्यांनी सावधगिरी बाळगली आहे.

जे लोक संक्रमित आढळले आहेत त्यापैकी बहुतेक समलैंगिक आणि बायसेक्शुअल (Gay and Bisexual) आहेत. दरम्यान अधिकाऱ्यांनी सावधगिरी बाळगली आहे.

जे लोक संक्रमित आढळले आहेत त्यापैकी बहुतेक समलैंगिक आणि बायसेक्शुअल (Gay and Bisexual) आहेत. दरम्यान अधिकाऱ्यांनी सावधगिरी बाळगली आहे.

लंडन, 07 जून: सोमवारी ब्रिटनमध्ये (Britain) मंकीपॉक्सची (Monkeypox) आणखी 77 प्रकरणे आढळून आली आहेत. त्यामुळे देशातील एकूण संक्रमित लोकांची संख्या 300 हून अधिक झाली आहे. आफ्रिकेबाहेर मंकीपॉक्स संसर्गाचा हा सर्वात मोठा प्रसार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जे लोक संक्रमित आढळले आहेत त्यापैकी बहुतेक समलैंगिक आणि बायसेक्शुअल (Gay and Bisexual) आहेत. दरम्यान अधिकाऱ्यांनी सावधगिरी बाळगली आहे की, रुग्णाच्या जवळच्या संपर्कात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला हा संसर्ग होऊ शकतो.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने रविवारी सांगितलं की, 24 पेक्षा जास्त देशांमध्ये मंकीपॉक्सचे 780 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आफ्रिकेबाहेर या आजाराने आतापर्यंत कोणाचाही मृत्यू झालेला नाही. आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने सांगितले की, या वर्षी कॅमेरून, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक, काँगो आणि नायजेरियामध्ये मंकीपॉक्सची 1,400 हून अधिक प्रकरणे आढळली आहेत आणि 63 लोकांचा मृत्यू झाला आहे. आफ्रिकेतील या चार देशांमध्ये ही स्थानिक पातळीवरील महामारी आहे. सीडीसीच्या म्हणण्यानुसार, जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये आफ्रिकेबाहेर या रोगाच्या प्रसाराशी संबंध असल्याचा सशक्त पुरावा आढळला नाही.

आघाडी पुन्हा 'ती' रणनीति वापरणार? राज्यात कोरोनाची भयानक रुग्णवाढ, अनिल देशमुखांना जामीन मिळणार? TOP बातम्या 

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची अचानक प्रकरणे सूचित करतात की अलीकडील काळात संसर्गाचा प्रसार आढळला नाही. WHO च्या एका अग्रगण्य सल्लागाराने गेल्या महिन्यात सांगितलं की, स्पेन आणि बेल्जियममधील दोन मोठ्या कार्यक्रमांमध्ये लैंगिक क्रियाकलापांमुळे हा रोग युरोप आणि इतरत्र पसरला आहे. ब्रिटनच्या हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने गेल्या आठवड्यात सांगितले की, समलिंगी आणि बायसेक्सुअल लोक ज्यांना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे ते 20 ते 49 वयोगटातील आहेत. तपासणीत असंही सूचित करण्यात आले आहे की, हा रोग यूके आणि इतरत्र गे बार आणि डेटिंग अॅप्सशी जोडलेला आहे.

First published:
top videos

    Tags: Corona updates, Corona virus in india, Coronavirus