बापरे! आता अंटार्क्टिकामध्येही कोरोना दाखल, जगभरातील संशोधकांमध्ये धास्ती

बापरे! आता अंटार्क्टिकामध्येही कोरोना दाखल, जगभरातील संशोधकांमध्ये धास्ती

जगाचे दक्षिण टोक असलेला अंटार्क्टिका (Antarctica) खंड या व्हायरसपासून दूर होता. आता अखेर या भागातही कोरोना (COVID-19) दाखल झाला आहे.

  • Share this:

अंटार्क्टिका, 23 डिसेंबर :  कोरोना व्हायरसनं (Coronavirus) संपूर्ण जग सध्या व्यापलं आहे. या व्हायरसच्या दहशतीखाली जगाचा या वर्षातील बहुतेक कालावधी हा लॉकडाऊनमध्ये (Lockdown) गेला आहे. जगाचे दक्षिण टोक असलेला अंटार्क्टिका (Antarctica) खंड या व्हायरसपासून दूर होता. आता अखेर या भागातही कोरोना (COVID-19) दाखल झाला आहे.

अंटार्क्टिकामध्ये काम करणाऱ्या चिलीच्या (Chile) रिसर्च सेंटरमधील 36 जणांनाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ‘डेली मेल’ या इंग्रजी वेबसाईटनं हे वृत्त दिले आहे. चिलीच्या रिसर्च सेंटरमधील 36 जण पॉझिटिव्ह आल्याची बातमी जाहीर होताच खळबळ उडाली आहे. 36 पैकी 26 जण हे लष्कराचे जवान असून 10 जण मॅनेजमेंट टीमचे सदस्य आहेत. कोरोना संक्रमण झालेल्या सर्व लष्करी जवानांना परत बोलवण्यात आले आहे. अंटार्क्टिकामध्ये अनेक देशांची रिसर्च सेंटर आहेत. जगभरात कोरोना व्हायरसंच प्रमाण वाढल्यानंतर त्या ठिकाणी देखील अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांना काम करताना अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहेत.

(हे वाचा-COVID-19: मोठी बातमी! पुढील आठवड्यात सरकार 'या' लशीला मंजुरी देण्याची शक्यता)

काय चूक झाली?

चिलीच्या टीमसाठी साहित्य घेऊन एक जहाज 27 नोव्हेंबर रोजी अंटार्क्टिकामध्ये आले होते. याच जहाजातून कोरोना विषाणू (Coronavirus) दाखल झाला अशी शक्यता आहे. चिलीच्या लष्करानं मात्र हा दावा फेटाळला आहे. हे जहाज पाठवण्यापूर्वी सर्व साहित्याची तपासणी करण्यात आली होती. त्याचबरोबर जहाजातील सर्व कर्मचारी देखील कोरोना नेगेटिव्ह होते असा त्यांचा दावा आहे.

नव्या कोरोना व्हायरसची धास्ती

ब्रिटनमध्ये नवीन कोरोना विषाणू सापडला असल्याच्या बातमीनंतर जगभर खळबळ उडाली आहे. भारतासह जगातील अनेक देशांनी आता ब्रिटनमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूकीवर निर्बंध आणले आहेत.

(हे  वाचा- लसीकरण करण्याआधी लोकांच्या शंका दूर करा, डॉक्टरांनी आरोग्यमंत्र्यांना आवाहन)

भारतामध्येही याबात विशेष खबरदारी घेतली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासाठी नवी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या निमांमुळे ब्रिटन आणि युरोपातून येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षेसाठी अनेक नियमांचं पालन करावं लागणार आहे.

Published by: News18 Desk
First published: December 23, 2020, 12:04 PM IST

ताज्या बातम्या