लसीकरण करण्याआधी लोकांच्या शंका दूर करा, डॉक्टरांच्या संघटनेनं लिहिलं आरोग्यमंत्र्यांना पत्र

 लसीकरण करण्याआधी लोकांच्या शंका दूर करा, डॉक्टरांच्या संघटनेनं लिहिलं आरोग्यमंत्र्यांना पत्र

जगातल्या अनेक देशांमध्ये आता लसीकरणाला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी त्याचे साईड इफेक्टही दिसून येत आहेत.

  • Share this:

मुंबई 22 डिसेंबर: भारतात आता कोरोना लसिकरणाची तयारी सुरू झाली आहे. काही महिन्यांमध्येच लसीकरण सुरू होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर देशातल्या डॉक्टरांची संस्था असलेल्या मेडिस्केप इंडिया आणि वी डाक्टर्स या संघटनेने आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि केंद्र सरकारला पत्र पाठवलं आहे. लोकांच्या शंका दूर करा, त्यांच्यात जनजागृती करा आणि त्यानंतरच लसीककरणाला सुरूवात करा अशी सूचना त्यांनी केली आहे.

जगातल्या अनेक देशांमध्ये आता लसीकरणाला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी त्याचे साईड इफेक्टही दिसून येत आहेत. लोकांच्या मनात शंका आहेत. त्या शंका दूर झाल्या पाहिजेत, त्यादृष्टिने जनजागृती करून या शंका दूर केल्या पाहिजेत तर लोकांच्या मनातली भीती दूर होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हायरसमुळे (coronavirus new strain)जगभर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यामुळे भारत सरकार अलर्ट झालं असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची त्यावर तातडीची बैठकही झाली आहे. केंद्र सरकार त्याबाबत अलर्ट असून आरोग्य मंत्रालयाने नवी नियमावलीही जारी केली आहे. यासंदर्भा काय केलं पाहिजे त्यासाठी सरकारने SOPही जाही केली आहे या नव्या निमांमुळे ब्रिटन आणि युरोपातून येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षेसाठी अनेक नियमांचं पालन करावं लागणार आहे.

कोरोना व्हायरसमध्ये झालेल्या नव्या बदलांची माहिती ब्रिटनने जागतिक आरोग्य संघटनेला दिली आहे. त्यायवर अजून संशोधन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

युरोपीयन सेंटर फॉर डिसिज कंट्रोल ने दिलेल्या माहितीनुसार हा नवा व्हायरस जास्त वेगाने पसरणारा असून तो युवकांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचं म्हटलं आहे. नव्या नियमांनुसार आता ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावरच RT आणि PCR टेस्ट केली जाणार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 22, 2020, 9:39 PM IST

ताज्या बातम्या