नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : एकीकडे संपूर्ण जग कोरोनाशी (Coronavirus) दोन हात करत असताना दुसरीकडे रशियानं दुसरी कोरोना लस (Russia Covid 19 Vaccine) तयार केल्याची घोषणा केली आहे. याची घोषणा खुद्द अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केली आहे. पुतिन यांनी माहिती दिली आहे की, रशियाने कोरोनाची दुसरी लस तयार केली आहे. एकीकडे जगभरातील सर्व देशात कोरोनाची लस विकसित करण्याचे काम चालू आहे. काही लसीच्या चाचण्याही घेत आहेत. रशियाने यापूर्वीच स्वतःची कोरोना विषाणूची लस बनवल्याचा दावा केला आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान सांगितले की, “नोव्होसिबिर्स्क वेक्टर सेंटरने बुधवारी कोरोनाच्या संसर्गाविरूद्ध लढणारी दुसऱ्या रशियन लशीची नोंद केली आहे.” पुतीन यांच्या या घोषणेपूर्वी त्यांनी ऑगस्टमध्ये सांगितले की स्पूटनिक व्ही (sputnik-V) नावाची पहिली कोरोनाची लस नोंदविली आहे. मात्र अद्याप या लशीचा अंतिम टप्पा पूर्ण झालेला नाही. वाचा- चिंता वाढली! ‘या’ देशात आली कोरोनाची दुसरी लाट, आणीबाणीसह लागू केला कर्फ्यू मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने आता नवीन लस बनविली असून कृत्रिम व्हायरस प्रथिने वापरुन रोग प्रतिकारशक्ती निर्माण केली गेली. स्पुतनिक व्ही अनुकूलित अॅडेनोव्हायरसचा यात वापर करण्यात आला आहे. पुतीन व्यतिरिक्त रशियाचे उपपंतप्रधान तातियाना गोलिकोवा म्हणाले की, या लसीमध्ये अत्यंत उच्च पातळीवरील सुरक्षा दिसून आली आहे. ते म्हणाले की आता या चाचणीत 40 हजार 000 स्वयंसेवकांचा समावेश असेल आणि नोंदणीनंतरच्या चाचण्यांमध्ये पुढे नेले जाईल. वाचा- सर्वात पहिल्या लशीसाठी भारतीय राणीने लावली होती जीवाची बाजी; अशी केली जनजागृती भारतात कधी येणरा कोरोनाची लस? कोरोनाची लस (coron vaccine) कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन (Health Minister Dr Harsh Vardhan) यांनी आपल्या सर्वांना पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर दिलं. आहे. पुढच्या वर्षीच भारतात कोरोनाची लस मिळेल, अशी आशा आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले, “पुढच्या वर्षी सुरुवातीलाच भारतात कोरोनाची लस उपलब्ध येईल. एकापेक्षा अधिक कंपनीच्या कोरोना लशी उपलब्ध होतील. ही लस देशभरात कशी वितरित करायची याबाबत तज्ज्ञांची समिती योजना तयार करत आहे”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.