मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Corona लसीकरणाची तयारी करताय, पण साइड इफेक्ट्सचं काय? राज्यांना द्यावा लागणार प्लॅन

Corona लसीकरणाची तयारी करताय, पण साइड इफेक्ट्सचं काय? राज्यांना द्यावा लागणार प्लॅन

लस कुणाला मिळणार हे ठरवण्यासाठी आणि लसीकरणात प्राधान्य मिळणाऱ्यांच्या याद्या तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना तसं कळवून त्यांच्याकडून यासंदर्भातला डेटाबेस मागवण्यात येणार आहे.

लस कुणाला मिळणार हे ठरवण्यासाठी आणि लसीकरणात प्राधान्य मिळणाऱ्यांच्या याद्या तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना तसं कळवून त्यांच्याकडून यासंदर्भातला डेटाबेस मागवण्यात येणार आहे.

कोविड 19 ची लस (Corona Vaccine) सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी सर्व प्रकारची दक्षता घ्यावी. लस दिल्यानंतर आरोग्यावर त्याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात.अशी सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिली आहे.

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : कोरोना लशीची (Corona Vaccine)निर्मिती अंतिम टप्प्यात असल्याच्या बातम्या येऊ लागल्यापासून लस आल्यानंतर पहिल्यांदा कुणाला द्यायची, कशी द्यायची याचा आराखडा केंद्र पातळीवर आणि राज्यांच्या पातळीवरही तयार होऊ लागला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं (Ministry of Health and Family Welfare) Covid-10 वरील लशीच्या वितरणासाठी नियोजन करण्याची सूचना राज्य सरकारांना केली आहे. पण त्याबरोबरच लशीच्या दुष्पपरिणामांचं काय? त्याचीही तयारी ठेवा, असा इशाराही राज्यांना दिला आहे.

लवकरच देशात कोविड १९ वरील लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. सर्व पातळ्यांवर त्याचं नियोजन करण्यात येत आहे. लोकांपर्यंत सुरक्षितपणे ही लस पोहोचवण्यासाठी योग्य व्यवस्था करताना, ही लस दिल्यानंतर त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम देखील होऊ शकतात हे लक्षात घेऊन त्यावरील उपचारांसाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यासह अन्य पूर्वतयारीही सजगतेने करावी, अशी सूचना केंद्राने राज्यांना केली आहे.

देशात जानेवारी 2021 मध्ये कोविड वरील लस उपलब्ध होण्याची शक्यता असून, ती देताना प्राधान्याने आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि अधिक गंभीर आजार असलेले लोक (Comorbid) यांना देण्यात येणार आहे.

कोरोना लसीकरणाचा सर्व खर्च उचलणार मोदी सरकार, अर्थसंकल्पात होऊ शकते घोषणा

हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या संदर्भात 18 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने राज्य सरकारांना एक पत्र पाठवलं आहे. त्यात कोविड 19 ची लस सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी सर्व प्रकारची दक्षता घ्यावी. लस दिल्यानंतर आरोग्यावर त्याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात. त्यामुळे लसीकरणातील सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी सध्याची अडव्हर्स इव्हेंट्स फॉलोइंग इम्युनायझेशन (AEFI) ची दक्षता यंत्रणा अधिक मजबूत करावी, अशी सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिली आहे. अडव्हर्स इव्हेंट्स फॉलोइंग इम्युनायझेशन (AEFI) ची दक्षता यंत्रणा मजबूत करण्यासाठी काही आवश्यक बाबीही सुचवण्यात आल्या आहेत. जेणेकरून लसीकरणाच्या काळात दुष्परिणामाबाबत तातडीने आणि सखोल माहिती केंद्राला देणे शक्य होईल, असे आरोग्य मंत्रालयानं या पत्रात म्हटले आहे.

कोविड-19 वरील लसीकरण (Covid Vaccination) मोहीम, त्यासाठी वाहतूक सुविधा, लस कोणाला द्यायची याचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार वाटप आणि लसीच्या दुष्परिणामांवर लक्ष देणे अशा विविध मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतर दोन दिवसांनी आरोग्य मंत्रालयानं या पत्राद्वारे राज्यांना पुढील सूचना दिल्या आहेत. लसीकरणासाठी तयारी करताना विकेंद्रीत नियोजनासाठी ब्लॉक टास्क फोर्स स्थापन करावा, असा सल्लाही आरोग्य मंत्रालयानं दिला आहे.

कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा सुरुवातीचा निकाल किती महत्त्वाचा आहे?

लसीकरणाच्या तयारीसाठी केंद्र आणि राज्य यांच्यात सुरू असलेल्या संपर्काचा हा पुढचा टप्पा आहे. शीतयंत्रणा साखळी आराखडा तयार करण्यासह तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी यंत्रणा सज्ज करण्याची सूचनाही आरोग्य मंत्रालयानं राज्यांना केली आहे. देशातील कोविड १९ च्या संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्य मंत्रालय मध्यवर्ती भूमिका पार पाडत आहे.

First published:

Tags: Corona, Corona vaccine