नवी दिल्ली, 18 जून : कोरोना लशीबाबत (Corona vaccine in India) अद्यापही लोकांच्या मनात काही प्रश्न, भीती कायम आहे. अशात तीन दिवसांपूर्वीच देशात कोरोना लशीमुळे पहिला मृत्यू (Corona vaccine death in india) झाल्याची बातमी समजली आणि खळबळ उडाली. यानंतर आता मोदी सरकारने कोरोना लशीबाबत मोठी माहिती दिली आहेत. कोरोना लशीमुळे मृत्यू झाल्याचं मान्य केल्यानंतर चौथ्या दिवशी केंद्र सरकारने कोरोना लशीबाबत (Corona vaccination) एक अहवाल जारी केला आहे.
भारतात सर्वात आधी कोरोना लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अभ्यासाचा अहवाल समोर आला आहे. 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू झालं. सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. ज्यांना ही लस देण्यात आली त्यांचा अभ्यास करण्यात आला. कोरोना लस हजारोंसाठी संजीवनी ठरली आहे, असं या संशोधनातून स्पष्ट झाल्याच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.
Studies show that chances of hospitalization are 75-80% less in vaccinated individuals. The possibility of such individuals needing oxygen support is around 8% and the risk of ICU admission is only 6% in vaccinated persons: Dr VK Paul, Member-Health, Niti Aayog pic.twitter.com/RMmgNFOrAV
— ANI (@ANI) June 18, 2021
हे वाचा - 48 तासांत काळे पडले; 42 दिवसांत Black fungus मुळे चिमुकल्यांनी गमावले डोळे
नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितलं, आरोग्य कर्मचाऱ्यांनाबाबत ज्या अभ्यासाचा अहवाल समोर आला आहे. संक्रमणाचा सर्वाधिक धोका असलेल्या ठिकाणी हे लोक असतात. अभ्यासानुसार कोरोना लस घेतल्यानंतर इन्फेक्शन झालं तरी 75 ते 80 टक्के रुग्णालयात जाण्याची गरज पडत नाही. ऑक्सिजनची गरज फक्त 8 टक्के भासते. आयसीयूमध्ये जाण्याची वेळ फक्त 6 टक्केच असते.
हे वाचा - 'Flying Sikh' ची प्रकृती पुन्हा ढासळली; ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने ICU त दाखल
कोरोना लसीकरणाचा हा डेटा सांगतो की कोरोना लस हजारो लोकांचा जीव वाचवतो आहे. त्यामुळे कोरोना लस घ्या, ही खूप गरजेची आहे, असं आवाहन व्ही. के. पॉल यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus