चंदीगड, 18 जून : 91 वर्षांचे महान धावपटू मिल्खा सिंग ( Milkha Singh) यांची प्रकृती खालावली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. गुरुवारी रात्री त्यांना ताप आला होता आणि त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीदेखील कमी झाली आहे. बुधवारी मिल्खा सिंग यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली होती, यात त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. ज्यानंतर त्यांना कोविड रुग्णालयातील आयसीयूमधून मेडिकल आयसीयूच्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. दरम्यान काही वेळापूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालवली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. रुग्णालयातील सर्व वरिष्ठ डॉक्टर त्यांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवून आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की, मिल्खा सिंग खूप अशक्त झाले आहेत. 17 मे रोजी मिल्खा सिंग यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारत होती, त्यानंतर 31 मे रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. डिस्चार्जनंतर ते सेक्टर-8 येथील आपल्या घरात कोविड नियमांचं पालन करीत आराम करीत होते. हे ही वाचा- 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाखांचा दंड; कोरोनाचे नियम मोडणाऱ्याला भलीमोठी शिक्ष ा मात्र अचानक 3 जून रोजी त्यांची प्रकृती बिघडली आणि ऑक्सिजनची पातळी खालावल्यानंतर त्यांनी पीजीआयमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून येथेच त्यांच्यावर उपचार सुरू होता. पहिल्यांदा 8 जून रोजी त्यांची कोविड चाचणी केली तेव्हा त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर 16 जून रोजी त्यांची कोविड चाचणी केली ती निगेटिव्ह आली आहे. अद्यापही ते मेडिकल आयसीयूमध्ये दाखल आहेत. गेल्या आठवड्यात मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात मिल्खा सिंग यांची पत्नी निर्मल कौर यांचं निधन झालं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







