मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Corona vaccine महागणार? कोरोना लशीच्या किमतीत बदल होणार

Corona vaccine महागणार? कोरोना लशीच्या किमतीत बदल होणार

 कोरोना वॅक्सिनच्या दोन डोसमधला गॅप फायदेशीर ?

कोरोना वॅक्सिनच्या दोन डोसमधला गॅप फायदेशीर ?

केंद्र सरकार आणि लस उत्पादक कंपन्यांमध्ये कोरोना लशीच्या किमतीबाबत (Corona vaccine price) नवा करार होणार आहे.

नवी दिल्ली, 14 जून : देशात 21 जूनपासून कोरोना लसीकरणात (Corona vaccination) मोठा बदल होणार आहे. 18+ सर्वांना मोफत कोरोना लस (Corona vaccine) दिली जाणार आहे. याचदरम्यान कोरोना लशीच्या किमतीबाबत (Corona vaccine price) मोठी माहिती समोर आली आहे. कोरोना लशीची किंमत वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आणि लस उत्पादक कंपन्यांमध्ये कोरोना लशीच्या किमतीबाबत नवा करार होणार आहे.

सरकारी सूत्रांनी सीएनबीसी-टीव्ही 18 ला दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने लशीच्या अधिक किमतीवरही लक्ष केंद्रीय केलं आहे. लसीकरणासाठी 45 हजार कोटी रुपये ते 50 हजार कोटी रुपयांच्या बजेटचा अंदाज लावला जात आहे.

रिपोर्टनुसार, सरकारने लसीकरण मोहिमेसाठी असलेल्या  35 हजार कोटींपैकी आतापर्यंत 6 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. सरकार आणखी 180 ते 190 कोटी डोस खरेदी करू शकते. 75 टक्के लोकांचं लसीकरण हा याचा उद्देश आहे. सुरुवातीला 50 टक्के नागरिकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट होतं. सुरुवातीला ठरवण्यात आलेल्या 150 रुपये किमतीबाबतही विचार केला जाऊ शकतो, असं सांगितलं जातं आहे.

हे वाचा - तुमच्याजवळ कोरोना रुग्ण असेल तर वाजणार अलार्म; 15 मिनिटांत देणार धोक्याची घंटा

राज्य सरकारनी याआधी अधिक किंमत दिली आहे. राज्यांसाठी कोविशिल्डची लस 300 रुपये प्रति डोस तर कोवॅक्सिनची लस  400  रुपये प्रति डोस होती. पण केंद्र सरकारसाठी या दोन्ही लशी 150 रुपयांना होत्या. दरम्यान आता केंद्र सरकारसाठी कोरोना लस महाग होऊ शकते.

केंद्र सरकारने याआधी दिलेल्या माहितीनुसार नव्या लसीकरणाच्या घोषणनंतर दोन्ही कोरोना लशींच्या 44 कोटी डोसची ऑर्डर दिलेली आहे. डिसेंबरपर्यंत हे डोस उपलब्ध होतील. यामध्ये कोविशिल्डच्या 25 कोटी आणि कोवॅक्सिनच्या 19 डोसचा समावेश आहे. याशिवाय लशीच्या खरेदीसाठी 30 टक्के सुरुवातीची रक्कम दोन्ही कंपन्यांना जारी करण्यात आली आहे.

हे वाचा - घाबरू नका! बिनधास्त घ्या Corona vaccine; सुरक्षिततेबाबत हा घ्या पुरावा

21 जूनपासून 75 टक्के लस केंद्र सरकारमार्फत दिली जाणार आहे तर 25 टक्के लस खासगी रुग्णालयं थेट लस उत्पादकांकडून खरेदी करू शकतात. यासाठी एक निश्चित किंमत सरकारने ठरवली आहे. खासगी रुग्णालयात कोविशिल्डची किंमत 780 रुपये, कोवॅक्सिनसाठी 1,410 रुपये, स्पुतनिक V 1,145 रुपये जास्तीत जास्त किंमत आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास संबंधित रुग्णालयाविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

First published:
top videos

    Tags: Corona, Corona vaccine, Corona vaccine cost, Coronavirus