Corona vaccination : कोरोना लसीकरणाच्या 6 महिन्यांत कोरोना लस घेतल्यानंतर नेमका किती गंभीर दुष्परिणाम झाला आहे, याची ही सरकारी आकडेवारी.
|
1/ 7
देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. आता 18+ सर्वांना कोरोना लस दिली जाते आहे. लसीकरण मोहिमेला 6 महिने झाले तरी अद्यापही अनेकांना कोरोना लशीची भीती वाटते आहे.
2/ 7
कोरोना लस घेतल्यानंतर काही जणांचे होणारे मृत्यू आणि दुष्परिणाम यामुळे नागरिक कोरोना लस घ्यायला घाबरत आहेत. पण कोरोना लस किती सुरक्षित आहे, याचा पुरावा देणारा आकडेवारी सरकारमार्फत मिळाली आहे.
3/ 7
सीएनए न्यूज 18 ला मिळालेल्या सरकारी आकडेवारीनुसार 16 जानेवारी ते 7 जूनपर्यंत कोरोना लस घेतल्यानंतर 488 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 26 हजार लोकांवर साइड इफेक्ट दिसून आले आहेत.
4/ 7
अॅडवर्स इवेंट फॉलोइंग इन्युनाइजेशन (AEFI) म्हणजे लशीनंतर उद्भवणाऱ्या समस्यांचा हा आकडा तुम्हाला जास्त वाटत असला तरी तज्ज्ञांच्या मते, एकूण लसीकरणाच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी आहे.
5/ 7
7 जूनपर्यंत देशात एकूण 23.5 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे, त्यापैकी 26200 AEFI प्रकरणं आहेत. टक्केवारीचा विचार करता हा आकडा फक्त 0.01 टक्के आहे. AEFI ची एकूण 26,200 प्रकरणं आहेत. त्यापैकी 488 म्हणजे फक्त 2 टक्के मृत्यू झाले आहेत.
6/ 7
सोप्या भाषेत सांगायचं तर 143 दिवसांत 10 हजार लोकांपैकी फक्त एका व्यक्तीवर लशीचा जास्त दुष्परिणाम दिसून आला. तर लस घेणाऱ्या 10 लाख व्यक्तींपैकी फक्त दोघांचा मृत्यू झाला आहे.
7/ 7
तज्ज्ञांच्या मते, एकूण कोरोना लसीकरणाच्या तुलनेत दुष्परिणामांचा परिणाम खूपच कमी आहे. त्यामुळे कोरोना लस सुरक्षित आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे तीन लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अशात कोरोनावर मात देण्यासाठी कोरोना लसही सर्वात प्रभावी शस्त्र आहे.