मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

COVID-19 Vaccination 2.0: काय आहेत कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लशींचे साइड इफेक्ट्स?

COVID-19 Vaccination 2.0: काय आहेत कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लशींचे साइड इफेक्ट्स?

देशात 1 मार्चपासून कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा (Coronavirus Vaccination 2.0) सुरू झाला आहे. लसीकरणास सुरुवात झाली असली तरीही नागरिकांमध्ये या लशींच्या साइड इफेक्टसबाबत (Side Effects) भीती आहे

देशात 1 मार्चपासून कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा (Coronavirus Vaccination 2.0) सुरू झाला आहे. लसीकरणास सुरुवात झाली असली तरीही नागरिकांमध्ये या लशींच्या साइड इफेक्टसबाबत (Side Effects) भीती आहे

देशात 1 मार्चपासून कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा (Coronavirus Vaccination 2.0) सुरू झाला आहे. लसीकरणास सुरुवात झाली असली तरीही नागरिकांमध्ये या लशींच्या साइड इफेक्टसबाबत (Side Effects) भीती आहे

    नवी दिल्ली, 03 मार्च: देशात 1 मार्चपासून कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा (Coronavirus Vaccination 2.0) सुरू झाला आहे. यामध्ये 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. या टप्प्यात आतापर्यंत 50 लाख लोकांनी नावनोंदणी केली असून, सोमवारी 6.44 लाखांपेक्षा अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही पहिल्याच दिवशी लस टोचून घेतली. त्यांना भारत बायोटेक (Bharat Biotech) निर्मित कोव्हॅक्सिन (CoVaxin) या लशीचा डोस देण्यात आला. दुसऱ्या दिवशी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मंत्र्यांनी लस टोचून घेतली. नागरिकांमध्ये या लशींच्या साइड इफेक्टसबाबत (Side Effects) भीती आहे. लस घेण्यापूर्वी त्याचे काय साइड इफेक्टस होतात याबाबत जाणून घेण्याची त्यांची इच्छा आहे. लस घेतल्यानंतर शरीरावर दिसून येणारे साइड इफेक्टस आणि ही लस कोणी घेऊ नये याबाबत मार्गदर्शन करणारी ही माहिती... केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, कोव्हॅक्सिन (Covaxin) आणि कोव्हीशील्ड (Covishield) या दोन्ही लसी सुरक्षित असून, त्याचे काही सर्वसामान्य साइड इफेक्टस आहेत. हे व्हॅक्सिन्स तयार करणाऱ्या कंपन्यांनी याबाबतची सविस्तर माहिती प्रसिद्ध केली आहे. कोव्हॅक्सिन (Covaxin) कोणी घेऊ नये? -ज्या लोकांना अॅलर्जी, ताप, रक्ताशी संबंधित आजार आहेत किंवा ज्यांचे रक्त पातळ आहे, त्यांनी कोव्हॅक्सिन घेऊ नये. -जे लोक काही औषधं घेत आहेत, ज्याचा परिणाम रोगप्रतिकार शक्तीवर होतो, त्यांनीही ही लस घेऊ नये. -गर्भवती महिला, स्तनपान देणाऱ्या माता, नुकतीच दुसरी कोणतीतरी लस घेतलेल्या महिला किंवा इतर कोणत्याही व्यक्तीस कोव्हॅक्सिनचा डोस न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (हे वाचा-...तर मला कोरोना लस घेता येईल का? लसीकरणाबाबत तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर) -लसीकरण अधिकार्‍यांनी सूचित केलेल्या गंभीर आरोग्य समस्या असलेल्या लोकांनीही कोव्हॅक्सिन घेऊ नये. कोव्हॅक्सिनचे साइड-इफेक्ट्स काय आहेत? -कोव्हॅक्सिनचे काही सौम्य दुष्परिणाम आहेत. यात इंजक्शन दिलेल्या ठिकाणी दुखणे, सूज येणे, ती जागा लालसर होणं, खाज सुटणे, हाताची वरची बाजू कडक होणे, इंजक्शन केलेल्या हातात अशक्तपणा जाणवणे, अंगदुखी, डोकेदुखी, ताप, त्रास, अशक्तपणा, पुरळ, मळमळ, उलट्या हे साइड इफेक्टस दिसू शकतात. -कंपनीनं असंही म्हटलं आहे की, या लशीमुळे तीव्र अॅलर्जी रिअॅक्शन होण्याची शक्यता फार कमी आहे. गंभीर दुष्परिणामांमध्ये श्वास घेण्यात अडचण, चेहऱ्यावर आणि घशाला सूज येणं, हृदयाचे ठोके वाढणं, अंगावर पुरळ येणं, चक्कर येणं आणि अशक्तपणा यांचा समावेश आहे. कोव्हिशील्ड कोणी घेऊ नये? पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटनं (Serum Institute) कोव्हिशील्ड (Covishield) या लशीच्या साइड इफेक्टसबाबत माहिती देणारे एक पत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये ही लस कोणी घेऊ नये, तिचे दुष्परिणाम काय याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. - ज्या लोकांना अॅलर्जी, ताप, रक्ताशी संबंधित आजार आहेत किंवा ज्यांचे रक्त पातळ आहे, त्यांनी कोव्हिशील्ड घेऊ नये. - ज्या लोकांना रोग प्रतिकारक शक्तीवर परिणाम करणारी औषधे सुरू आहेत, त्यांनीही ही लस घेऊ नये. - गर्भवती महिला, गर्भवती होण्याचे नियोजन करत असलेल्या महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता त्यांनीही ही लस घेऊ नये. -ज्यांनी दुसरी अँटी-कोव्हिड लस घेतली आहे, त्यांनीही कोव्हिशील्ड घेऊ नये. -या लसीच्या पहिल्या डोसनंतर ज्यांना अॅलर्जी आली असेल, त्यांनी देखील ही लस घेऊ नये. कोव्हिशील्डचे साइड-इफेक्ट्स काय आहेत? - कोव्हिशील्डचे साइड इफेक्ट्स सौम्य स्वरूपाचे असून, यात इंजक्शन दिलेल्या ठिकाणी दुखणे, सूज येणे, ती जागा लाल होणे, खाज सुटणे याचा समावेश आहे. (हे वाचा-कोरोनामुळे शिक्षणाचे वाजले बारा, ही तरुणी स्थलांतरीत मुलांना देतेय मोफत शिक्षण!) - साधारणपणे लस घेणाऱ्यांना अस्वस्थता, अशक्तपणा वाटू शकतो. शिवाय थंडी वाजणे किंवा गरम होणं, डोकेदुखी, मळमळ, सांधे दुखी, इंजक्शन दिलेल्या ठिकाणी गाठ, ताप, उलट्या होणं किंवा फ्ल्यूसारखी लक्षणं दिसू शकतात. तसंच घशात खवखव, नाक वाहणे, खोकला अशी लक्षणं दिसून येतात. - गंभीर लक्षणांमध्ये चक्कर येणं, भूक कमी होणं, पोटदुखी, खूप घाम येणं, खाज यांचा समावेश आहे. असे साइड इफेक्ट्स आढळल्यास काय करावे? सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (Centre for Decease Control and Prevention) यांनी दिलेल्या सुचनेनुसार, कोणत्याही व्यक्तीला लस घेतल्यानंतर वेदना किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर त्यांनी ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा. लस घेतल्यानंतर आपल्याला होणाऱ्या कोणत्याही त्रासाबद्दल  इबुप्रोफेन, एस्पिरिन, अँटीहिस्टामाइन्स किंवा एसीटामिनोफेन आदी औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. इतर कोणतेही आजार नसल्यास असे त्रास झाल्यावर एरवी आपण ही औषधे घेत असल्यास अशी औषधे घेण्यास हरकत नाही, मात्र लस घेण्यापूर्वी असं कोणतंही औषध घेऊ नका कारण यामुळं गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Corona, Corona hotspot, Corona spread, Corona vaccine, Corona vaccine cost, Corona vaccine in market, Corona virus in india

    पुढील बातम्या