मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

कोरोनामुळे शिक्षणाचे वाजले बारा, ही तरुणी स्थलांतरीत मुलांना देतेय मोफत शिक्षण!

कोरोनामुळे शिक्षणाचे वाजले बारा, ही तरुणी स्थलांतरीत मुलांना देतेय मोफत शिक्षण!

कोरोनामुळे (Corona Virus) शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. काही भागांत अजूनही शाळा सुरु झाल्या नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण (Online Classes) दिले जात आहे, पण अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल नसल्यामुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही.

पुढे वाचा ...

हनमकोंडा, 2 मार्च : कोरोनामुळे (Corona Virus) शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. काही भागांत अजूनही शाळा सुरु झाल्या नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण (Online Classes) दिले जात आहे, पण अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल नसल्यामुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही. अशामध्ये तेलंगणातील (Telangana) एक तरुणी काही स्थलांतरीत (Migrants)विद्यार्थ्यांसाठी शिक्षिका झाली आहे. कोरोनाच्या काळात ही तरुणी या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे मोफत देत आहे.

तेलंगणातील हनमकोंडा (Hanamkonda) येथे राहणारी 24 वर्षीय एस. वनजा (S.Vanaja) उच्चशिक्षित आहे. वजनाने इंटरमीडिएट शिक्षण पूर्ण केले आहे. वडिलांचे निधन झाल्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी तिच्यावर आणि तिच्या आईवर आली आहे. घराचा गाडा चालवण्यासाठी वनजा आणि तिची आई एक छोटेसे दुकान चालवतात. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, वनजा हनमकोंडा येथील एशियन मॉलच्या जवळ 20 स्थलांतरीत विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. या विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वनजा मदत करत आहे.

हनमकोंडा येथील एशियन मॉलच्या (Asian mall) जवळच वनजाचे दुकान आहे. दुकान सांभाळत ती स्थलांतरीत मुलांना शिकवते. मॉलच्या जवळच उघड्या नाल्याशेजारी असलेल्या झाडाखाली ती रोज सकाळ-संध्याकाळ या मुलांना शिक्षण देते. केजीपासून ते इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना वनजा शिक्षण देत आहे.

वनजा ज्या विद्यार्थ्यांना शिकवते त्यांच्याकडे मोबाइल नाही. त्यामुळे त्यांना ऑनलाइन शिक्षण (online education) घेता येत नाही. ही सर्व मुलं स्थलांतरीत कामगारांची आहेत. जे कामानिमित्त या भागामध्ये आले आहेत. ही स्थलांतरीत कुटुंब महाराष्ट्र आणि छत्तीसगड येथील आहेत. या मुलांना शिक्षणासाठी कायमच संघर्ष करावा लागत आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे आणि आता कोरोना महामारीमुळं विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे वनजा या विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देते.

ही स्थलांतरीत मुलांची कुटुंब गेल्या दोन दशकांपासून तेलंगणातील शासकीय जमिनीवर वसलेल्या झोपडपट्टीमध्ये राहतात. मूळची तेलंगणाच्या भोंगिर जिल्ह्यातील रहिवासी असलेली वनजा देखील याच झोपडपट्टीत राहते. टीएनआयइशी बोलताना वनजाने सांगितले की, 'मी लहान असतानाच माझ्या वडिलांचं निधन झालं. माझी आई एकटीच कमवणारी होती. त्यामुळे मला आईला दुकान चालवण्यासाठी मदत करावी लागली. त्यामुळे मी माझे शिक्षण पूर्ण करु शकले नाही.'

कोरोना महामारीमुळे शिक्षण क्षेत्रातही मोठे बदल झाले आहेत. अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत मुलभूत सुविधा नसल्यामुळे या मुलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बऱ्याच मुलांनी त्यामुळे शिक्षण देखील सोडून दिलं आहे. अशा मुलांसाठी वनजा देवाच्या रुपाने उभी राहिली आहे.

वनजाने या मुलांची दुर्दशा आणि त्यांचा संघर्ष समजून घेतला आणि त्यांना आवश्यक असणारे मुलभूत शिक्षण देण्याचा ती प्रयत्न करत आहे. यामधील अनेक मुलांना चांगलं जेवण मिळत नाही, त्यात शाळा बंद झाल्यामुळे त्यांना मध्यान्ह भोजनही (midday meals) मिळणं बंद झालं आहे. वनजानं सांगितलं की, 'माझ्याकडे क्लासरुम नसला तरी सुद्धा या मुलांना शिक्षण देणं माझी जबाबदारी आहे.'

First published:

Tags: Coronavirus, Education, India