मुंबई , 16 ऑक्टोबर : भारतासाठी कोव्हिड 19 लसीकरण मोहीम (Corona Vaccination) हा एक ऐतिहासिक क्षण ठरतोय. जवळपास वर्षभरापूर्वीपासून सुरू झालेल्या या महासाथीला नियंत्रणात आणण्यासाठी देशात मोठ्याप्रमणात लसीकऱण मोहीम सुरू आहे. जगात सर्वाधिक कोरोना लसीकरण भारतात झालं आहे. भारत आता लसीकरणाचा नवा विक्रम करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सेलिब्रेशनची तयारी सुरू झाली आहे. प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर (padma shri kailash kher) यांच्या आवाजातील कोरोना लसीकरणाचं गाणं (Corona Theme Song) लाँच करण्यात आलं आहे (Corona vaccination anthem). ‘टीके से बचा है देश टीके से’ असं हे गाणं आहे. हे गाणं हिंदी भाषेत आहे. या गाण्यात लसीकरणामुळे कोरोनाला कसं दूर ठेऊ शकतो असा संदेश देण्यात आला आहे. प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी तसंच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते हे गाणं लाँच करण्यात आले. यावेळी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली तसंच पीएनजीचे सचिव तरुण कपूर, मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
Union Ministers @mansukhmandviya and @HardeepSPuri launch the anthem on India's #COVID19 vaccination.
— PIB India (@PIB_India) October 16, 2021
The song has been sung by eminent singer Padma Shri@Kailashkher
Read: https://t.co/2vLzRpO2Ug pic.twitter.com/Pltny6mEWs#VaccineCentury | #LargestVaccineDrive
यावेळी हरदीप सिंह पुरी म्हणाले की, भारत पुढील आठवड्यात 100 कोटी लसींचे लक्ष्य साध्य करणार आहे. मार्च 2020 मध्ये जेव्हा देश कोरोनामुळे लॉकडाऊन झाला तेव्हा भारत पीपीई किट, व्हेंटिलेटर आणि इतर आवश्यक वैद्यकीय सेवासंबंधी घटक बाहेरच्या देशातून आयात करत होता. आता मात्र या सर्व गोष्टी आपण देशांतर्गत तयार करू शकलो आणि आता आपण सेवा देण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच हे सगळं सर्वांच्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योगदानामुळे शक्य झाल्याचे सांगत त्यांनी धन्यवाद मानले.
A song that slays vaccine hesitancy!
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) October 16, 2021
टीके से बचा है देश टीके से
टीके से बचेगा देश टीके से
Joined my colleagues Dr @mansukhmandviya Ji & Sh @Rameswar_Teli Ji to release India’s Vaccination Anthem #BharatKaTikakaran sung by Sh @Kailashkher Ji.#SabkaSaathSabkaPrayas pic.twitter.com/K18brCngXK
तसेत ते पुढे म्हणाले की, या कोरोना लढाईच्या काळात काही लोकांनी चुकीच्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केला मात्र ते असं करण्यात अपयशी ठरले. अशावेळी कोरोना लढाई ही एक लोक चळवळ बनत गेली. कोरोना व्हायरल हा आपला शत्रू आहे आणि लोकांनी त्याच्याशी लढण्याचे प्रसंगी दोन हात करण्याचे ठरवलं. तसचे एखादा गायक लोकांमध्ये जनजागृती करू शकतो. म्हणूनच कैलाश खेर यांचे हे गाणं देशाच्या लोकांच्या मनात लसीकरणाविषयी जागृती निर्माण करण्यास मदत करेल, असं हरदीप सिंह पुरी यावेळी म्हणाले. वाचा :अंकिता लोखंडेची बहीण आहे तिच्यापेक्षाही बोल्ड; ग्लॅमरस फोटोशूटने वेधलं होतं सर्वांचं लक्ष आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले की, देशात 97 कोटीहून अधिक लसीकरण करण्यात आले आहे. सरकार आणि लोकांनी स्वदेशी लस निर्मितीसाठी सरकार आणि लोकांनी आपल्या संशोधक आणि वैद्यकीय सेवेवर विश्वास ठेवला. सर्वांच्या प्रयत्नामुळेच आम्ही देशातील कोपऱ्या कोपऱ्यात कोरोना सल पोहचवू शकलो. त्यामुळेच आात मोठ्या वेगाने लसीकरण सुरू असल्याचे त्यांनी शेवटी सांगतिलं. वाचा :Sardar Udham Singh: विकी-कतरिना आणि कियारा-सिद्धार्थ पोहोचले ‘सरदार उधम सिंह’च्या स्क्रिनिंगला; फारच उत्सुक दिसले कलाकार या गाण्याविषयी कैलाश खेर म्हणाले की, संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर त्यात इतरांना प्रेरणा देण्याची एक शक्ती देखील आहे. भारत हा एक महान देश आहे आणि जगाने देखील आपली क्षमता आणि कामगिरी ओळखली आहे. परंतु काही गैरसमज आहेत जे दूर करणे आवश्यक आहे. अशा प्रेरणादायी गाण्यांद्वारे जागृती निर्माण केली जाऊ शकते. तसेच हे गाणं लोकांच्यात लसीकरणाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी खूप मदत करेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.