कोरोनानंतर 5 जिल्ह्यांमध्ये नव्या आजाराचं थैमान; पाहा यात तुमचा जिल्हा तर नाही ना?
कोरोना रुग्णसंख्या घटल्यानंतरही या जिल्ह्यांची चिंता कायम आहे. आता इथं नव्या आजाराचा प्रकोप झाला असून परिस्थिती भयंकर आहे.
|
1/ 10
कोरोनावर नियंत्रण मिळत असतानाच आता नव्या आजाराचं संकट उभं ठाकलं आहे. कोरोना रुग्णसंख्या घटत असताना म्युकरमायकोसिसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे.
2/ 10
आतापर्यंत एकूण 2113 प्रकरणांची नोंद झाली आहे. तर 120 मृत्यू झाले आहेत. फक्त 213 रुग्ण बरे 1780 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
3/ 10
राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये म्युकोरमायसिसने शिरकाव केलेला आहे. 7 जिल्ह्यांची परिस्थिती तर भयंकर आहे.
4/ 10
म्युकोरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू पुण्यातच आढळले आहेत. 620 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 29 रुग्ण बरे झाले असून 564 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
5/ 10
पुण्यानंतर नागपूर, नांदेड, मुंबई, अहमदनगर, सांगली या जिल्ह्यात अनुक्रमे 240, 142, 118, 116, 101 रुग्णांची नोंद झाली आहे.
6/ 10
तर 4 जिल्ह्यांत 100 पेक्षा कमी पण 50 पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. यामध्ये औरंगाबाद - 81, बीड - 69, ठाणे - 75, सोलापूर - 54, वर्धा 62 रुग्ण आहेत.
7/ 10
एकूण 20 जिल्ह्यांत म्युकरमायकोसिसने बळी घेतले आहेत. पुण्यात 27 तर नांदेडमध्ये 22 सर्वाधिक मृत्यूची नोंद आहे.
8/ 10
ठाण्यात 10, बीडमध्ये 8 आणि सोलापुरात 7, मुंबई शहर आणि उपनगरात अनुक्रमे 5, 6 मृत्यू झाले आहेत.
9/ 10
कोल्हापूर-साताऱ्यात प्रत्येकी 5, जळगावात 4, अहमदनगर-वाशिममध्ये प्रत्येकी 3 रुग्णांचा जीव गेला आहे.
10/ 10
तर गोंदिया, रत्नागिरीत प्रत्येकी दोन आणि चंद्रपूर, वर्धा, यवतमाळमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे.