जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Second Wave of Corona: भारतानं केलं वैज्ञानिकांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; म्हणून गंभीर परिणाम झाल्याचा दावा

Second Wave of Corona: भारतानं केलं वैज्ञानिकांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; म्हणून गंभीर परिणाम झाल्याचा दावा

Second  Wave of Corona: भारतानं केलं वैज्ञानिकांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; म्हणून गंभीर परिणाम झाल्याचा दावा

भारताने कोविडची पहिली लाट थोडी ओसरू लागताच निर्बंध शिथील केले आणि नेते मंडळीही गाफील राहिली. त्यामुळेच आजची गंभीर परिस्थिती ओढवल्याचा दावा नेचर या जगप्रसिद्ध मॅगझीनमध्ये करण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

दिल्ली, 6 मे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Second Wave of Corona) देशात वाईट परिस्थिती निर्माण केली आहे. दररोज 3 लाखापेक्षा जास्त रूग्ण आढळत आहेत. त्यातच देशात ऑक्सिजनची कमतरता (Lack of oxygen) असल्याने आणि बेड उपलब्ध होत नसल्याने मृत्यूंचा आकडा वाढलेला आहे. स्मशानामध्येही रांग लावायची वेळ आलेली आहे.  कोरोनाची लाट ओसरत असल्याचं वाटत असताना मार्च महिन्यापासून ही लाट आणखीन वाढली. भारताने वैज्ञानिकांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याने हे संकट ओढवलं, असा दावा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय नेचर मॅगझिनने केला आहे. भारताने कोविडची पहिली लाट थोडी ओसरू लागताच मोठ्या प्रमाणावर निर्बंध उठवले आणि लोक धार्मिक आणि राजकीय कारणांसाठी अनिर्बंध गर्दी करू लागले. नेत्यांनी त्यावर काहीच उपाय योजना केली नाही, असं नेचर ने लेखात म्हटलं आहे. भारताप्रमाणेच वाईट परिस्थिती ब्राझीलमध्येही निर्माण झालेली आहे. मागील महिन्यात एकाच दिवसात 4 लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यावरून देशातील भीषण परिस्थितीची कल्पना येते. भारताची लोकसंख्या पाहता पहिल्या लाटेच्या वेळेसच कठोर पावलं उचलण्याची गरज वैज्ञानिकांनी व्यक्त केली होती. भारतात या वर्षी कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे सरकार गाफील राहिलं. त्यामुळे हळुहळु लॉकडाऊन कमी करण्यात आलं. लोक मोकळेपणाने फिरु लागले. बिझनेस, दुकानं, मॉल्स सुरु करण्यात आले. मोठेमोठे समारंभ, रॅली, प्रचार सभा आयोजीत होउ लागल्या. त्यामुळे सोशल डिस्टंन्सीग पाळणं बंद झालं. तर, लोकांनी मास्कचा वापरही बंद केला. परिणामी कोरोना जोमाने पसरायला वाव मिळाला.

जाहिरात

यादरम्यान कोरानावरच्या उपायजोनामध्ये कुठे चूक झाली हे शोधताना. मागे जाऊन विचार करायला हवा. त्यासंदर्भातला हा लेख महत्वाचा आहे. कोरोनावर उपाय योजना करण्यासाठी देशातल्या वैज्ञानिकांमुळे फायदा मिळू शकला असात.मात्र सरकारची चूक आज सगळ्यांना महागात पडल आहे. प्रिंसिपल साईटिफिक ऍडवायजर (Principal Scientific Advisor) कृष्णास्वामी विजयराघवन यांनी एक दावा केला आहे. 2 वर्षआधीच 29 एप्रिलला 700 वैज्ञानिकांनी (Scientist) सराकारी डेटा एक्सेस मिळण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली होती. ज्याकडे सरकरने दुर्लक्ष केलं. नॅश्नल स्टॅटेस्टिकल कमिशन (National Statistical Commission) च्या सिनीयर अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर ही मागणी केली गेली होती. कोरोना टेस्ट आणि त्यावरील उपाय योजना यांची योग्य माहिती मिळत नसल्याने पुढील संशोधनात अडचणी येत असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. ( ‘कोरोना संकटातील हे महत्त्वाचे पाऊल’, पंतप्रधान मोदींनी केली केरळची प्रशंसा ) भारताप्रमाणे ब्राझीलनेही **(Brazil)**कोरोनाच्या लढ्यात वैज्ञानिकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं आहे. ज्याचे परिणाम ते भोगत आहेत. ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी कोरोना एक साधा फ्लू असल्याचा दावा केला. त्यामुळे या देशात आवश्यक असणाऱ्या उपायोजना केल्या गेल्या नाहीत. मागच्या आठवड्यात या देशात कोरोनामुळे 4,00,000 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातही मृतांची संख्या वाढते आहे. त्यामुळे दोन्ही देशात कोरोनावरुन राजकारण सुरु असल्याचं दिसत आहे. दोन्ही देशातील सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरलेले आहेत. ( धक्कादायक! अंत्यसंस्काराची वाट पाहतंय 2 महिन्यांचं बाळ; पालकांनी काढला पळ ) कोरानाच्या संक्रमाण काळात आता देखील सरकारने योग्य आणि तात्काळ निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचं देशातील वैज्ञानिक सांगत आहेत. त्यासाठी वैज्ञानिंकांना डेटा अॅक्सिस  दिल्यास वैज्ञानिक देशाला या संकाटामधून वाचवू शकतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात