मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

नवी समस्या! कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये दिसत आहे 'या' आजाराची लक्षणं

नवी समस्या! कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये दिसत आहे 'या' आजाराची लक्षणं

ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 40,91,801 एवढी असून 1,25, 500 जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 40,91,801 एवढी असून 1,25, 500 जणांचा मृत्यू झाला आहे.

आजारातून बरं झाल्यानंतरही काही लक्षणं रुग्णामध्ये दिसून येतात. तशीच काही लक्षणं दिल्लीतील रुग्णांमध्ये दिसून आली आहेत.

  • Published by:  Priyanka Gawde
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : कोरोनाच्या लसीवर (Corona vaccine) जसं संशोधन केलं जातंय तसंच कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या परिस्थितीवरही डॉक्टर लक्ष ठेऊन आहेत. आजारातून बरं झाल्यानंतरही काही लक्षणं रुग्णामध्ये दिसून येतात. तशीच काही लक्षणं दिल्लीतील रुग्णांमध्ये दिसून आली आहेत. बऱ्या झालेल्या रुग्णांच्या अवस्थेला पोस्ट कोव्हिड फेज म्हणतात. अशा अवस्थेतील जे रुग्ण तपासणीला येत आहेत त्यांना विसराळूपणाचा त्रास होत आहे असं निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवलं आहे. या नव्या समस्येनं डोकं वर काढल्यामुळे चिंता वाढली आहे. याबाबत दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमधील डॉ. अजित जैन म्हणाले, ‘ कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना विविध पद्धतीचे त्रास होत आहेत. पोस्ट कोविड क्लिनिकमध्ये आलेल्या 250 पैकी 80 जणांना मेंदू किंवा स्मरणशक्तीशी संबंधित अडचणी आहेत. 20 टक्के लोकांना सांगितलं की त्यांना विसराळूपणाचा त्रास होतो आहे. वाचा-या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर बरेचदा व्हायरस पेशींवर हल्ला करतात त्यामुळे त्या क्षीण होतात त्याचा परिणाम रुग्णाच्या मेंदूवर होतो आणि त्याला विसरभोळेपणाचा त्रास होतो. कोरोनाच्या काळात ज्यांच्या मेंदूला भरपूर सूज आली होती त्यांच्यांकडून स्मरणशक्ती कमी झाल्याच्या तक्रारी येत आहेत. कोरोनातून बरे झालेल्या 70 टक्के लोकांना अशक्तपणा, चक्कर येणं यासारख्या अडचणी जाणवत आहेत.’ वाचा-खूशखबर! कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा डोकं गरगरणं, चक्कर येणं, अशक्तपणा ही लक्षण सामान्य आहेत. कोरोनाच नाही तर दुसऱ्या विषाणूनी शरीरावर हल्ला केला तरीही रुग्ण अशाच तक्रारी करतात, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. अपोलो हॉस्पिटलचे डॉ. यश गुलाटी म्हणाले, ‘ विषाणूंशी लढण्यासाठी शरीरात तयार झालेले अँटिजेन रोगप्रतिकारक यंत्रणेत काही बदल करतात, ज्यामुळे रोगप्रतिकार यंत्रणा अतिप्रतिक्रिया देते. त्यामुळेच बरं झाल्यानंतरही रुग्णाला ताप, अंगदुखी आणि इतर त्रास होतात. जे काही दिवसांनंतर आपोआप बरे होतात. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.’ वाचा-अरे देवा! आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि... कोणत्याही आजारानंतर लक्षणं थोडे दिवस राहतात पण नंतर ती निघून जातात याची आपल्यालाही सवय असते. सर्दी-पडसं, खोकला हे हवामानात बदल झाल्यावर होणारे नेहमीचे आजार आहेत आणि ते तसेच बरेही होऊन जातात. पण कोरोनानी जगभर जो काय उच्छाद मांडून ठेवलाय त्यामुळे प्रत्येकालाच आपल्या जीवाची भीती आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठीही वेटिंग लिस्ट आहे त्यामुळे या भीतीत आणि चिंतेत आणखी वाढ होत आहे. पण दिल्लीतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोरोना होऊन गेला आणि अशी लक्षणं दिसली तरीही योग्य उपचार घेऊन विश्रांती घेणं हाच उपाय आहे.
First published:

Tags: Corona, Coronavirus

पुढील बातम्या