नवी दिल्ली, 28 जुलै: देशात कोरोनाची दुसरी लाट (2nd Wave of Coronavirus) काही प्रमाणात ओसरली असताना आता मात्र तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका समोर असल्याचं चित्र आहे. ऑगस्ट महिन्यापासून (August Month) देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर कोरोनाची (Corona Virus) तिसरी लाट येणार असून ती सप्टेंबर (September) महिन्यात अधिक तीव्र होण्याची शक्यता आधीपासूनच वर्तवण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला होता. त्यातच गेल्या काही दिवसात देशात कमी दिसणारी कोरोनाबाधितांची आकडेवारी पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात नवे 42 हजार 966 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. याआधी गेले काही दिवस हा आकडा 40 हजारांच्या खाली होता. अचानक वाढलेली कोरोनाची आकडेवारी नक्कीच धोकादायक आहे. आज सकाळी आठ वाजता आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 43,654 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याच वेळी 41,678 रुग्ण बरे झाले आहेत आणि 640 मृत्यूची नोंद झाली. सद्यस्थितीत देशात 3 लाख 99 हजार 436 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज ठाकरेंचा 15 दिवसाच्या आत दुसरा पुणे दौरा, असा असेल तीन दिवस मुक्काम तिसऱ्या लाटेचा धोका सध्याची वाढलेली आकडेवारी पाहिल्यास, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाची रोजची रुग्णसंख्या 40 हजारांच्या खाली होती. आता जुलै महिना संपायला अवघे तीन दिवस राहिले आहेत. अशातच ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसानंतर कोरोनाची रुग्णसंख्या वाढत जाण्याची शक्यत आहे. तसंच त्यानंतर सप्टेंबरमध्ये ती अधिक तीव्र होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एसबीआयचा रिपोर्ट काय सांगतो एसबीआयने एक रिपोर्ट जारी केला आहे. ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. कोविड-19 : द रेस टू फिनिशिंग लाइन हा कोरोनाबाबतचा रिपोर्टन एसबीआयने जारी केला आहे. या रिपोर्टनुसार कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टमध्ये येईल. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात दररोज 10 हजार पर्यंत नवी प्रकरणं सापडतील. ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून प्रकरणं पुन्हा वाढतील. सप्टेंबरमध्ये या लाटेचं पिक येईल म्हणजे ती उच्चांक शिखर गाठेल. तिसऱ्या लाटेचं पिक हे दुसऱ्या लाटेतील पिकपेक्षा 1.7 पट जास्त असेल. एसबीआयने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबतही अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार मेच्या तिसऱ्या आठवड्यात दुसरी लाट उच्चांक शिखर गाठेल असं म्हटलं होतं आणि जवळपास हा रिपोर्ट खरा ठरला होता. हेही वाचा- समोसाची वाढती किंमत विचारणं जीवाशी, युवकानं घेतलं स्वतःला पेटवून देशातील गेल्या 24 तासातील कोरोनाची आकडेवारी गेल्या 24 तासात एकूण नवीन रुग्ण: 42,966 गेल्या 24 तासात एकूण बरे: 41,491 गेल्या 24 तासातील एकूण मृत्यू: 641 आतापर्यंत एकूण संक्रमित: 3.14 कोटी आतापर्यंत बरे झालेले रुग्णः 3.06 कोटी आतापर्यंत एकूण मृत्यू: 4.22 लाख सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांची एकूण संख्या: 3.93 लाख
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.