नवी दिल्ली, 28 जुलै: सध्या देशावर कोरोना व्हायरसचं (Coronavirus) संकट आहे. या महामारीचा सामना करण्यासाठी कोरोनाच्या लसीकरणाचा (Vaccine)वेग वाढवण्यात आला आहे. त्यातच कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हे सर्वात प्रभावी उपाय आहे. सद्यपरिस्थितीत देशात मुख्य रुपात कोविशील्ड (covishield)आणि कोव्हॅक्सिन या लशींचे डोस लोकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी देत आहेत.
आतापर्यंत देशात जवळपास 45 कोटी लोकांना लशींचे डोस देण्यात आले. आता कोविशील्ड या लसीसंदर्भात सरकारनं काही खुलासे केले आहेत. मंगळवारी सरकारनं माहिती दिली की, कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोविशील्ड 93 टक्क्यांपर्यंत प्रभावशाली आहे. या लसीमुळे मृत्यूदर 98 टक्क्यांपर्यंत कमी असल्याचं आढळून आलं आहे.
यावेळी केंद्र सरकारनं सशस्त्र सैन्य वैद्यकीय महाविद्यालयाच्या Armed Forces Medical College)अभ्यासाचा संदर्भ दिला आहे. कोविड- 19 च्या दुसऱ्या लाटेदरम्यान व्हायरसच्या एका नव्या व्हेरिएंट म्हणजेच डेल्टा व्हेरिएंटचा धोका उद्भवला होता, असंही सरकारनं म्हटलं आहे.
LIC IPO: मार्चच्या आधी येणार एलआयसीचा आयपीओ; सरकारचा काय आहे प्लॅन?
अभ्यासात असे दिसून आले आहे की, कोविडशील्ड लस घेतलेल्या लोकांचा व्हायरसपासून 93 टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळतं. नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी म्हटलं की, हा निष्कर्ष 15 लाख डॉक्टर आणि फ्रंटलाइन वर्कर्सवर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार समोर आला आहे.
संरक्षणासाठी लसीकरण हा एकमेव उपाय नाही
कोविड19 च्या लसीकरणाची भूमिका स्पष्ट करताना डॉ. पॉल म्हणाले की लसीकरणामुळे विषाणूचा संसर्ग कमी होतो. लसीकरण कोणत्याही प्रकारे व्हायरसपासून संरक्षणाची संपूर्ण हमी देत नाही. त्यासाठी आपल्याला लसीकरणासह कोरोनाच्या काळात सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona virus in india, Coronavirus, Covid-19 positive