जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / गर्भवतीला 100 % कोरोनाचा संसर्ग, व्हेंटिलेटवर असतानाच झालं सिजेरियन; बाळाला पाहताच सर्वजणं हैराण!

गर्भवतीला 100 % कोरोनाचा संसर्ग, व्हेंटिलेटवर असतानाच झालं सिजेरियन; बाळाला पाहताच सर्वजणं हैराण!

गर्भवतीला 100 % कोरोनाचा संसर्ग, व्हेंटिलेटवर असतानाच झालं सिजेरियन; बाळाला पाहताच सर्वजणं हैराण!

राज्यातील बारामती जिल्ह्यात हा हैराण करणारा प्रकार समोर आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बारामती, 22 मे : राज्यातील बारामतीमधून एक हैराण करणारं वृत्त समोर आलं आहे. मात्र ही बाब निराशा नाही तर आशा वाढवणारी ठरली आहे. येथे एका कोरोना संसर्ग झालेल्या महिलेने नवजात बाळाला जन्म दिला. हैराण करणारी बाब म्हणजे या महिलेच्या फुप्फुसात 100 टक्के कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि डॉक्टरांनी आशाही सोडली होती. महिलेने जेव्हा बाळाला जन्म दिला तेव्हा ती व्हेंटिलेटरवर होती. बारामतीच्या मेहता रुग्णालयाच्या टीमने हा चमत्कार करून दाखविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 6 एप्रिल रोजी 28 वर्षीय गर्भवती महिला रुग्णालयात दाखल झाली होती. ही महिला बारामती जिल्ह्यातील देऊळगावातील राजे नावाच्या गावात एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्य आहे. हिला तीन वर्षांची मुलगीही आहे. महिलेच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग झाला होता. महिला जेव्हा रुग्णालयात दाखल झाली तेव्हा तिला फणफणून ताप होता. याशिवाय खोकला आणि श्वास घ्यायलाही त्रास जाणवत होता. महिलेचं ऑक्सिजन 90 पर्यंत पोहोचलं होतं. हे ही वाचा- वसईत 15 दिवसात 155 कोरोना रुग्णांचा मृत्यू; आरोग्य विभागाचा गलथानपणा कारणीभूत? महिला व्हेंटिलेटरवर असताना लेबर पेन झाले सुरू रुग्णालयात दाखल झाल्याच्या दोन ते तीन दिवसांनंतर महिलेचं ऑक्सिजन लेव्हर खाली येऊ लागलं. उपचारादरम्यान तिला ऑक्सिजनची गरज भासू लागली. 10 एप्रिलला तिची प्रकृती ढासळली होती. त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. महिलेचा एचआरसीटी स्कोर 25 असल्याने तिची प्रकृती गंभीर झाली होती. अशाही परिस्थितीत या आईने प्रसूतीच्या कळा सोसल्या. महिलेचं पहिलं मूल सिजेरियनने झालं होतं, यंदाही सिजेरियन ऑपरेशनची गरज होती. व्हेंटिलेटरवर असतानाही डॉक्टरांनी महिलेवर शस्त्रक्रिया सुरू केली. आणि पाहता पाहता महिलेने एका सुदृढ बाळाला जन्म दिला. बाळ कोरोनामुक्त चमत्कार म्हणजे नवजात बाळ केवळ सुदृढचं नाही तर कोरोनामुक्त आहे. बाळाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. सध्या बाळाला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. मात्र दुसरीकडे आईची प्रकृती नाजूक होती. पुढील 13 दिवस तिला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येईल. यादरम्यान डॉक्टर महिलेचं मनोबल वाढवत आहेत. मातृत्वने जगण्याची इच्छा वाढवली हे पाहिलं की वाटतं मातृत्वाच्या इच्छेने महिलेची जगण्याची इच्छाशक्ती वाढली. शेवटी 45 दिवसांच्या उपचारानंतर महिला कोरोनामुक्त आणि स्वस्थ आहे. नवजातदेखील आईच्या कुशीत सुखरुप आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात