• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • लॉकडाऊननंतरही 'या' जिल्ह्यात कोरोनाचा चढता आलेख; वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासन चिंतेत

लॉकडाऊननंतरही 'या' जिल्ह्यात कोरोनाचा चढता आलेख; वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासन चिंतेत

राज्यातील या जिल्ह्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतरही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचं दिसत आहे.

 • Share this:
  बीड, 27 मार्च : बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा सलग तिसऱ्या दिवशी तीनशे पार गेला आहे. आज जिल्ह्यात तब्बल 375 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात 2713 रुग्णांची तपासणी केली असता यात पॉझिटिव्हचा आकडा वाढलेला दिसत आहे. बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा कमी करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर देखील रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील सर्व सीसीसी सेंटर हाऊसफुल होण्याच्या मार्गावर असून आणखी काही सीसीसी सेंटर सुरू करण्याचा विचार आरोग्य विभाग करत आहे. (Corona increasing in district even after the lockdown) जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या अहवालात वडवणी 5, शिरूर 4, पाटोदा 23, परळी 38, माजलगाव 25, केज 27, गेवराई 24, धारूर 12, बीड 112, आष्टी 30 आणि अंबाजोगाई मध्ये 75 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बीड जिल्हयात आत्ता पर्यंत आढळलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 23657 पर्यंत पोहोचली असून सक्रिय रुग्णांचा आकडा 2754, मृतांची संख्या 610 आणि कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 21522 इतकी आहे. सध्या जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट 13.1 आणि मृत्यूदर 2.73 इतका आहे. (Corona increasing in beed even after the lockdown) राज्यातील कोरोनाचा महाविस्फोट होत असल्याने मुख्यमंत्र्यांना रात्रीच्या कर्फ्यूची घोषणा केली आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण राज्यभरात लॉकडाऊन लागू करणे शक्य नसल्याने त्यांनी सध्या तरी रात्रीच्या कर्फ्यूची घोषणा केली आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये मात्र लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बीडनंतर नांदेडमध्येही लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. बीडमध्ये लॉकडाऊन लागू केल्यानंतरही कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. हे ही वाचा-पोलिसांच्या 'ऑल आऊट' मोहिमेमुळे नवी मुंबईकरांची दाणादाण, पाहा PHOTOS बीडमधील रुग्णसंख्या 20 मार्च-265 21 मार्च  336 22 मार्च 246 23 मार्च  207 24 मार्च 299 25 मार्च 335 26 मार्च 383 27 मार्च 375 नवे रुग्ण
  Published by:Meenal Gangurde
  First published: