नवी मुंबई, 26 मार्च : अखेर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी आपली अख्खी फौजच रस्त्यावर उतरवली आहे. कोरोना रोखण्यात नागरिकांचे सहकार्य कमी असून बेफिकीरी जास्त असल्याने अखेर पोलिसांनी पुढाकार घेत नवी मुंबई मनपाच्या सहकार्याने ‘ऑल आउट’ उपक्रम राबवला आहे. या उपक्रमात कोरोना प्रादुभाव कमी होण्यासाठी नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून यात 600 पोलीस 100 नवी मुंबई महापालिका कर्मचारी आणि 200 पोलीस मित्रांचा सहभाग होता. नवी मुंबईत कोरोना रुग्ण संख्येची वाढ ही अति चिंताजनक पातळीवर गेली असून रोजच्या रोज त्यात कमालीची वाढ होत आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील परिमंडळ पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शखाली ऑल आउट मोहीम राबविण्यात आली. यात सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे, मास्क न घालणाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. सदर कारवाई शुक्रवारी संख्याकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत नवी मुंबई महापालिका हद्दीत करण्यात आली. अचानक रस्त्यावर बाजाराच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस दिसत असताना काही तरी गडबड झाल्याचे नागरिकांना वाटले. हे ही वाचा-
VIDEO: मुंबईकरांना गांभीर्य नाहीच! पबमध्ये कोरोना नियम पायदळी, 230 जणांवर कारवाई
मात्र पोलिसांनी धडाधड कारवाई सुरू केल्यावर मास्क घाई घाईने चढवली जात होती. मात्र पोलीस अगोदर फोटो काढून नंतर त्या व्यक्तीला जाब विचारला जात होते आणि त्यानंतर समजावल्यावर मनपा कर्मचारी पाचशे रुपये दंड वसूल करत होते. सर्वाधिक कारवाई सिग्नल आणि एपीएमसीमध्ये करण्यात आल्या. शहरातील सर्वच महत्वाच्या सिग्नलवर पोलिसांनी वाहन चालकांवर कारवाई केली ज्यांनी मास्क घातलेला नव्हता, यात विशेष म्हणजे बहुतांश रिक्षा चालकांनी मास्क आवर्जून घातलेला दिसून आला. तर हेल्मेट घातल्यावर मास्क का घालू म्हणून अनेक ठिकाणी पोलिसांशी वादाचे प्रसंग घडले.
सुरेश मेंगडे पोलीस ( उपायुक्त परिमंडळ एक ) शुक्रवारी परिमंडळ एकमध्ये सर्वत्र ऑल आउट उपक्रमांतर्गत कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आखलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ज्या लोकांनी मास्क ऐवजी रुमाल वापरला आणि गरिबांना मास्कचे वाटपही करण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.